Breaking News

ओबीसीची जणगणना करून क्रिमीलेअर संदर्भात बी.पी. शर्मा समिती रद्द करा - ओबीसी महासंघ


भास्कर गिरी । माजलगाव  

ओबीसी ची जणगणना करून क्रिमीलेअर संदर्भात बी.पी. शर्मा समिती रद्द करा या मागण्याचे निवेदन भारत सरकार व महाराष्ट्र राज्य ला ओबीसीच्या विविध मागण्याचे निवेदन ओबीसी महासंघाच्या वतीने माजलगाव तहसीलदार मार्फत देण्यात आले.

          ओबीसी च्या संविधानिक मागण्याचे निवेदन शासनाला माजलगाव तहसील कार्यालया मार्फत ओबीसी महासंघाचे कोटूळे सर, केशव भारती यांनी तहसीलदार डॉ प्रतिभा गोरे यांच्या हस्ते देण्यात आले . ओबीसी ची सन2021 च्या होणाऱ्या जनगणनेमध्ये जातनिहाय जनगणना करावी व ओबीसी ची लोकसंख्या आकडे घोषीत करावेत, ओबीसी प्रवर्गासाठी असलेली क्रिमीलेअर ची असंविधानिक अट तात्काळ रद्द करावी , ओबीसी च्या क्रिमी लेअर संदर्भात नेमण्यात आलेली बी.पी. शर्मा समिती तात्काळ रद्द करावी, सरकारी खाते ,विभाग, उद्योगधंदे ,कंपन्या ,सेवा याचे खाजगी करण करू नये ज्या सरकारी खात्याचे ,विभागाचे, उद्योग धंद्याचे, कंपन्या, सेवा यांचे खाजगीकरण केले आहे त्याचे परत सरकारी करण करावे,  ओबीसी आरक्षणाची मेडिकल इंजिनिअरिंग अशा प्रत्येक क्षेत्रात योग्य प्रकारे आंमलबजावणी करावी  मेडीकल च्या जागा कमी करु नयेत, U P S C ,MPSC  या आयोगाच्या सदस्या मध्ये ओबीसी चे प्रतिनिधी सदस्य असावेत  interview panel  मध्ये ओबीसीचा प्रतिनिधी असावा, सुप्रिम कोर्ट , हायकोर्ट यामध्ये न्यायधिश व सरकारी खाते, विभाग, उद्योगधंदे, कंपन्या ,सेवा, मध्ये सेक्रेटरी ,जॉईट सेक्रेटरी, सुपर क्लासवन , क्लासवन सारखी पदे कॉम्पीटीशन एक्झाम द्वारे व आरक्षणानुसार भरण्यात यावी  Lateral entry बंद करावी.
वरिल सर्व ओबीसीच्या मागण्या संविधानिक असुन या मागण्याची तात्काळ अंमलबजावणी करून ओबीसी प्रवर्गाला न्याय द्यावा नसता समस्त ओबीसी बांधव रस्त्यावर उतरुन संविधानीक मार्गाने लढा लढतील.
   यावेळी ओबीसी महासंघाचे संस्थापक अध्यक्ष मा. एम . पी . काठुळे, के.भारती, कुंडलिक आढाव, बी.गलांडे, नारायण खेत्री, ए.रासवे, ज्ञानेश्वर रासवे, भिमराव काठुळे, पांडुरंग काठुळे  यांच्या उपस्थिती निवेदन देण्यात आले आहे.

No comments