Breaking News

कोरोनाचा पार्श्वभूमीवर पोळा सण साध्या पद्धतीने साजरा करा - सुरेश धस


बीड : ग्रामीण भागात बैलपोळा हा सण  शेतकरी दिवाळी सारखा मोठ्या प्रमाणात साजरा करतात. कारण वर्षभर राबणारे आणि बळीराजाची सेवा करणा-यांचा हा सण महत्त्वाचा माणला जातो..बऱ्याच गावात मानाचा बैल म्हणून परंपरा आहे. परंतु कोरोणाची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता , यंदाचा सण साध्या पद्धतीने साजरा करावा. कुणीही एकत्र येऊ नये आणि विनाकारण कारवाई करून घेऊ नये.असे आवाहन भाजप आ.सुरेश धस यांनी केलंय..दरम्यान बीड जिल्ह्यात सध्या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असल्याने , बीड जिल्ह्यात पोळा हा सण सार्वजनिक उत्सव  करण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांनी तसा आदेश देखील काढला आहे. यामुळे यंदाचा शेतकऱ्याच्या पोळ्याच्या सणावर विरजण पडलयाचे दिसत आहे.

No comments