Breaking News

विठ्ठलाच्या मंदिरासाठी बाबासाहेबांच्या वंशजाची पंढरपुरात गर्जना .....


प्रकाश आंबेडकरांच्या नेतृत्वामध्ये लाखो  वारकऱ्यांनी टाळ मृदंगाच्या गजरात काढण्यात आला मोर्चा 

बीड जिल्ह्यातून वंचितचे हजारो पदाधिकारी- कार्यकर्ते झाले सहभागी

विठ्ठल मंदिराला आले छावणीचे स्वरूप, पोलिसांचा तगडा बंदोबस्त

पंढरपूर  : शासनाचा महसूल वाढवा म्हणून देशभरात दारूची दुकाने सुरू करण्यात आली. परंतु गत  पाच महिन्यापासून मंदिर बंद आहेत. मंदिरे दर्शनासाठी पूर्ववत खुली करण्यात यावी. या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं  पंढरपुरात एल्गार पुकारण्यात आला असून वंचितचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली आज पंढरपूरातील विठ्ठलाचे मंदिर खुल करण्यासाठी लाखो वारकऱ्यांचा मोर्चा टाळ- मृदंगाच्या गजरात काढण्यात आला.  यावेळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता, त्यामुळे मंदिर परिसराला छावणीचे स्वरूप आले होते.

कोरोना महामारी संसर्ग वाढू नये, यासाठी सरकारने देशभरातील मंदिर बंद केली होती.  गत पाच महिन्यापासून लॉक डाऊनमुळे देशभरातील मंदिर बंद आहेत, त्यामुळं मंदिर परिसरातील व्यवसाय अडचणीत आले असून यावर उदरनिर्वाह असणाऱ्या लोकांची उपासमार होत असताना केंद्र व राज्य सरकारने शासनाचा महसूल वाढवण्यासाठी दारूची दुकाने उघडली आहेत. मात्र मंदिर उघडण्यासाठी सरकार चालढकल करत आहे. परिणामी मंदिरावर अवलंबून असणाऱ्या प्रत्येक घटकाचे हाल होतायेत. त्यामुळे विश्व वारकरी संघटना व वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मंदिर दर्शनासाठी खुली करण्यासाठी प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली पंढरपूरमध्ये लाखो वारकऱ्यांचा सोमवारी (दि.३१) मोर्चा काढण्यात आला. 

प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वात निघालेल्या मोर्चात वारकऱ्यांनी विठ्ठल नामाचा जयघोष करून टाळ- मृदंगाचा गजर करीत हा मोर्चा विठ्ठल मंदिराकडे निघाला होता. दरम्यान मंदिर परिसरात सुमारे चारशेच्या आस- पास पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. तसेच सात रस्ते बंद करण्यात येऊन दहा फूट बॅरिकेट लावण्यात आली होती. त्यामुळे या परिसराला छावणीचे स्वरूप आले होते. अत्यंत शांतता व उत्साहाच्या वातावरणात भक्ती भावाने निघालेल्या मोर्चात सहभागी वारकऱ्यांची विठ्ठलाच्या दर्शनाची औत्सुकता शिगेला पोहचत असल्याचं दिसत होतं. 
या आंदोलनात राज्यभरातून लाखो वारकऱ्यांसह वंचितचे कार्यकर्ते सहभागी झाले होते. बीड जिल्हयातून वंचित चे जिल्हाध्यक्ष प्रा. शिवराज बांगर, बाळासाहेब वाघमारे, अशोक हिंगे, अर्जुन दळे, वडमारे यांच्यासह हजारो पदाधिकारी - कार्यकर्त्यांनी जिल्ह्यातून उपस्थित होते. राज्य सरकारला भरली धडकी

काही दिवसांपुर्वी बस चालू करण्यासाठी प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली बस डेपो समोर वंचितच्या वतीनं डफली बजाओ आंदोलन करण्यात आले होते. या आंदोलनामुळे राज्य शासनाला अखेर बस चालू कराव्या लागल्या आहेत. त्यानंतर वंचितचे लॉकडाऊन मध्ये राज्यातील सर्वात मोठे आंदोलन असून वारकऱ्यांसह पंढरपूर मध्ये विठ्ठलाच मंदिर खुल करण्यासाठी आज आंदोलन करण्यात आले. या आंदोलनामुळे राज्य सरकारमध्ये धडकी भरली आहे. 

1 comment:

  1. लोकांना लावा टाळ कुटायला

    ReplyDelete