Breaking News

आजपासून सरसगट लाॅकडाऊन रद्द करा : बसपाच्या कापसे यांची मागणी


बीड : लॉक डाऊन मुळे सामान्यांचे जीवन जगणे असाह्य झाले असून बाजारपेठ बंद असल्याने व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान झालं आहे. त्यामुळे आजपासून सरसगट लॉक डाऊन रद्द करून सर्व शासकीय व निमशासकिय कार्यालय, बाजारपेठ पूर्ववत नियमितपणे सुरू करण्यात यावी. अशी मागणी बसपाचे बीड जिल्हा प्रभारी सतीश कापसे यांनी पत्रकाद्वारे केली. 
बीड जिल्ह्यात दहा दिवसांचा लाॅकडाऊन करून सर्वसामान्य लोकांना कोंडीत ठेवण्याचे काम कोरोना महामारीच्या नावाखाली चालू असल्याचा आरोप कापसे यांनी करत गेल्या सहा महिन्यांत दुकान बंद असल्याने दुकानाचे भाडे  देणे शक्य नसल्याने तसेच व्यवसायिक नुकसान झाल्याने अनेकांना आत्महत्या केल्याशिवाय पर्याय राहिला  नाही. प्रत्येक व्यक्ती आता मानसिक ताणतणावात जीवन जगत आहे. रोजगारचा गंभीर प्रश्न  निर्माण झाला आहे.  कौटुंबिक कलह निर्माण झाले आहेत. अनेकांचे जिवीतहानी होण्याची शक्यता आहे. कोरोना महामारी सोबतच आता जिवन जगता येईल तेवढेच जगावे लागेल. यामुळे सर्व सामान्यांच्या जीवावर बेतलेला लाॅकडाऊन रद्द करून सर्व शासकीय व निमशा शासकीय कार्यालयसह सर्व बाजारपेठ नियमितपणे सुरू करण्यात यावे, अशी मागणी बहुजन समाज पार्टी बीडच्या वतीने करण्यात आली आहे. 

No comments