Breaking News

दहा दिवसांच्या संततधार पावसामुळे मुगाला फुटले मोड बळीराजा पुन्हा अडचणीत ; महसुल प्रशासनाने पंचनामे करण्याची मागणीदिंद्रुड : धारुर तालुक्यातील देवदहिफळ शिवारात मागील १० दिवसापासून झालेल्या संततधार पावसामुळे आणि आभाळात ढगांची गर्दी, उनसावलीचा खेळ सुरु असताना अधून मधून पावसाचे जोरदार आगमन होत आहे. या पावसामुळे शेतात उगवलेल्या मुगाचे प्रचंड प्रमाणात नुकसान होत आहे. मुगाला कोंब फुटून मातीत मिसळत आहे परिणामी उत्त्पन्न ९० टक्के घटल्याने लावलेला खर्च निघणे अवघड बनले असून, ऐन मोसमात निसर्गाच्या अस्मानी संकटामुळे बळीराजा पुरता अडचणीत आला असल्याचे दिसते आहे. 

अगोदरच बळीराजा खरीपात झालेल्या अल्प पावसाने हैराण झाला असताना उरलेली पिके तरी साथ देतील या आशेने कामाला लागला आहे. मात्र ऐन मोसमात पिके आली असताना पोळ्याच्या काही दिवस अगोदरपासून सर्वत्र संततधार सुरु झाली आहे. यामुळे नदी शेतातील रानात पाणी साचून हाताला आलेली पिके नुकसानीत आली आहेत. गेल्या ४ वर्षांपासून अवर्षणाने ग्रस्त झालेला बळीराजा यंदा समाधानकारक पीकस्थितीने व पावसाने भरभरून उत्पन्नाच्या आशेने आनंदि झाला होता.परंतु काढणीला आलेले मूगाला कोंब फुटल्याने प्रचंड नुकसान झाल्याने पुन्हा शेतकरी हतबल झाला आहे.हि बाब लक्षात घेता महसूल प्रशासनाने तात्काळ नुकसानग्रस्त भागातील शेतकऱ्यांच्या पिकाचे पंचनामे करून आर्थिक मदत मिळवून द्यावी अशी मागणी देवदहिफळ ग्रामस्थांनी केली आहे.   

मूग मातीत मिसळला..!
"माझ्या एक हेक्टर ४६ आर शेतात मी मुगाचे पिक घेतले होते, पावसाने काढणीला आलेला मुग मातीत मिसळला आहे. पिक पिवळ पडुन जमिनीत मुग मिसळल्यामुळे ७० ते ८० टक्के पिक हातातुन गेले आहे, असे शेतकरी अंगद राख म्हणाले. 

No comments