Breaking News

अर्थिक तडजोड करून खोटा गुन्हा दाखल करणाऱ्या पोलिस निरीक्षकांवर कार्यवाही करा- पोलीस अधिक्षकांकडे वकील- पत्रकाराची निवेदनाद्वारे मागणी


गेवराई :  गेवराई पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक यांनी अर्थिक तडजोड करूण शहरातील एका वकील पत्रकार तसेच सामाजिक कार्यकर्ते यांच्यासह पिडीत महिलेवर खोटा गून्हा दाखल केल्याचा आरोप करत  गेवराई पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक पुर्षोत्तम चोभे यांच्यावर कार्यवाही करण्याची मागणी वकील , पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते यांनी पोलिस अधीक्षकांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली.

मंगळवारी पोलीस अधिक्षक यांना दिलेल्या निवेदनातून  गेवराईचे  पोलिस निरीक्षक यांच्यावर गंभीर स्वरूपाचे आरोप करण्यात आले आहेत तसेच १८ जून रोजी ००:१६ मीनिटानी गेवराई च्या एका वकीलावर बलात्कार आणि एट्रॉसिटी चा गून्हा दाखल करण्यात आला सदरची महिला या वकीलाची पक्षकार होती या परितक्त्या महिलेची या वकीलाने सर्वत्र फसणूक केली असुन तिचे लैंगिक शोषन करण्यात आले होती हि तक्रार दाखल होताच गेवराई पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक यांनी आरोपी वकील यांच्याशी हातमिळावणी करून अर्थिक देवाणघेवान करून चळवळीत काम करणा-या एका वकील , पत्रकार सामाजिक कार्यकर्ते यांच्याविरूध्द तब्बल दोन तासांनी २ : ३३ ला खोटा सामुहिक बलात्कार करण्याचा प्रयत्न करणे जबरी चोरी करणे गँगरेपचा गून्हा गेवराई पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक यांनी दाखल केला आहे
तसेच सदर प्रकरणाचा तपास वरिष्ठ पोलिस अधिकारी यांच्याकडे देण्यात यावा घटनच्यावेळी चे मोबाईल लोकेशन तपासावे पोलिस निरीक्षक पुर्षोत्तम चोभे व तक्रारदार यांचे सिडीआर तपासावेत बनावट साक्षीदार यांची कसुन चौकशी करावी यासह अर्थिक देवाण घेवान करूण हा गून्हा दाखल केला आहे तसेच तक्रारदार महिलेच्या पतीवर हा गून्हा दाखल झाल्याने काऊन्टंर चेक म्हणून हा गून्हा दाखल केला असल्याची बाब पोलिस अधीक्षक यांच्या निर्शनास आणून दिली असून तक्रार महिला हिच्या पती ज्यावर एट्रॉसिटी दाखल झाली आहे तसेच यांची गून्हेगारी पार्शभूमी असल्यासे सगळे पुरावे या तक्रारीत दिले आहेत यासर्व प्रकरणाला जवाबदार असणा-या गेवराई पोलिस निरीक्षक यांच्यावर कार्यवाही करावी अशी मागणी ऍड. सोमेश्वर कारके, पत्रकार अविनाश इंगावले, सय्यद माजेद यांनी केली आहे.

No comments