Breaking News

खा. प्रितमताई मुंडें यांनी केले चिंचोली माळी येथील देशमुख कुटुंबीयांचे सांत्वन !


गौतम बचुटे । केज 
तालुक्यातील चिंचोलीमाळी येथील दत्तात्रय उर्फ बाळासाहेब  बापुसाहेब देशमुख यांचे नुकतेच सर्पदंशाने निधन झाले होते. खासदार डॉ. प्रितमताई मुंडे यांनी दि.२० ऑगस्ट शुक्रवार रोजी देशमुख कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले.

स्वर्गीय दत्तात्रय उर्फ बाळासाहेब देशमुख हे आपल्या शेतातील जनावरांना गवत टाकताना त्यांना दि. २९ जुलै रोजी साप चावला होता. त्यांना केज येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता वैद्यकीय अधिका-यांनी त्यांना मयत घोषित केले होते. या दु:खद प्रसंगी चिंचोली माळी येथील देशमुख कुटुंबियांचे सांत्वन करण्यासाठी शुक्रवारी खा. प्रितमताई मुंडे यांनी देशमुख कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. यावेळी त्यांच्या सोबत आमदार पती अक्षयभैय्या मुंदडा, भाजपाचे जेष्ठ नेते रमेश आडसकर, सुनीलआबा गलांडे, जि.प.सदस्य विजयकांत मुंडे, तालुका अध्यक्ष भगवान केदार, सभापती पती विष्णू घुले,  डॉ. वासुदेव नेहरकर, सुरेंद्र तपसे, माजी सभापती संदीप पाटील,  स्विय सहाय्यक राजेंद्र लोढा, सरपंच सुनील देशमुख, प्रकाश राऊत, दगडु दळवे, डॉ. महेंद्र राऊत, अरुण काळे, दिलीप गायकवाड, रविंद्र गलांडे, पत्रकार मधुकर सिरसट, अनिल गलांडे, चंद्रकांत भुजबळ, अक्षय नखाते, राज काळे, अभिजीत यादव, विक्रम घुंबरे, अमोल जाधव आदींची उपस्थिती होती.

No comments