Breaking News

तांबोळी युवा मंचातर्फे पालीच्या तळ्यात मत्स्य बीज सोडणार


बीड  : शहरातील धडाडीचे सामाजिक कार्यकर्ते आणि तांबोळी युवा मंच चे जिल्हाध्यक्ष साजन रईस तांबोळी यांच्या वाढदिवसानिमित्त पालीच्या तळ्यात मत्स्यबीज सोडण्यात येणार असल्याची माहिती तांबोळी युवा मंच कडून देण्यात आलेल्या पत्रकातून कळविण्यात आली आहे.
            पत्रकात तांबोळी यांनी म्हटले आहे की,
 मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून आतापर्यंत निर्माण झालेल्या कोरोना महामारी च्या परिस्थितीमुळे सर्वसामान्य, हातावर पोट भरणाऱ्या नागरिकांचे हाल होत आहेत. अनेक कुटुंबीयांना दोन वेळेस च्या जेवणाची भ्रांत निर्माण झाली आहे. अशा वातावरणात वाढदिवस आल्याने त्यानिमित्त वायफळ खर्चाला फाटा देवून, कुठलाही उधळपट्टीचा कार्यक्रम न घेता सर्वसामान्य नागरिकांना उपयोगी पडेल, असा कार्यक्रम घेण्याचे ठरले असल्याने वाढदिना दिवशी तांबोळी युवा मंच चे पदाधिकारी, सदस्य आणि मित्रपरिवार सह पालीच्या तळ्यात  मत्स्यबीज सोडणार आहे. जेणेकरून याचा पुढे चालून सर्वसामान्यांना लाभ व्हावा. अशी माहिती तांबोळी युवा मंच कडून देण्यात आलेल्या पत्रकात नमूद केली आहे.

No comments