Breaking News

साळेगावच्या इयत्ता आठवीतील यश बचुटेने घरच्या घरी बनविले वाफेचे मशीन

झिरो मेंटन्स आणि झिरो खर्चाचे वाफेचे मशीन: प्रधानमंत्री मोदींच्या मेक इन इंडिया अंतर्गत आत्मनिर्भरतेला दिले मूर्त स्वरूप

गौतम बचुटे । केज 
गरज ही शोधाची जननी आहे. आता या कोरोनाच्या जागतिक महामारीत सर्वत्र लॉकडाउन असल्यामुळे अनेक वस्तूंचे भाव कित्येकपट वाढलेले आहेत. तसेच कोरोना पासून बचाव करण्यासाठी सर्वसाधारण कुटुंब हे वाफेचे मशीन घेणे परवडणारे नाही. यावर उपाय म्हणून केज तालुक्यातील साळेगाव येथील इयत्ता आठवीत शिकत असलेल्या विद्यार्थ्याने कोणत्याही खर्चाविना अगदी मोफत वाफ घेण्यासाठी वाफेचे मशीन बनविले आहे.

साळेगाव ता. येथील चि. यश बचुटे हा विवेकानंद विद्यालय केज येथे इयत्ता आठवीत शिकत आहे. त्याला एकदा सर्दी झाल्यामुळे आणि कोरोनाची भीतीचे सावट असल्यामुळे त्याचे वडील बलभीम बचुटे यांनी पाचशे रु किमंतीचे स्टिमर विकत आणले परंतु ते लगेच खराब झाले. एके दिवशी चि. यश याने त्याची आई  वैशाली ह्या  स्वयंपाक करीत असताना गॅस वरील कुकर उतरून ते खाली ठेवले व आतील शिजलेले पदार्थ काढण्यासाठी कुकरची शिट्टी काढलेली पाहिले. तेव्हा यश याच्या लक्षात आले की, याच कुकरचा वापर करून आपल्याला घरच्या घरी एक वाफेचे मशीन तयार करता येऊ शकते. तेही झिरो खर्च आणि झिरो मेंटन्स व अगदी सहज मिळणाऱ्या वस्तू पासून. मग त्याने ही कल्पना त्याचे वडील एसटी वाहक बलभीम बचुटे आणि चुलते डॉ. विवेक बचुटे यांना सांगितली. मग त्या प्रमाणे त्याने कुकर मध्ये पाणी टाकून व त्यात बाम टाकून त्याची शिट्टी काढली आणि कुकर गॅसवर ठेवून शिटीजवळ एक पीव्हीसी पाईप किंवा लोखंडी नळी किंवा घरात वापरत असलेली फुंकणी वापरून वाफ चेऱ्यावर व घशात घेण्यासाठी प्रयोग यशस्वी केला. त्यामुळे आता प्रत्येकाला घरच्या घरी सर्दी, पडसे किंवा खोकला येत असल्यास घरच्या घरी वाफ घेता येणे शक्य आहे.

या छोट्या संशोधकांचे पत्रकार गौतम बचुटे, कमलाकर राऊत, जय जोगदंड, अक्षय वरपे, सचिन राऊत, अशोक बचुटे, रितेश बचुटे व त्याचे चुलते डॉ . आकाश बचुटे यांनी अभिनंदन व कौतुक केले आहे.

No comments