Breaking News

राज्यातील देवस्थाने खुली करण्यासाठी माजलगावात घंटानाद

माजलगाव : महाराष्ट्रातील देवस्थाने, धार्मिक स्थळे खुले करण्यासाठी विविध धार्मिक संस्था, संघटना यांनी घंटानाद आंदोलन केले. धर्मस्थळे खुले करण्यासाठी भारतीय जनता पार्टीने पाठिंबा दर्शवला असुन राज्यातील मंदिरे खुली करण्याची परवानगी देण्यात यावी. या मागणीसाठी राज्य सरकारचे  लक्ष वेधण्यासाठी राज्यव्यापी घंटानाद आंदोलन पुकारले आहे.

लोकनेत्या पंकजा मुंडे व खा डॉ प्रीतम मुंडे यांच्या मार्गदर्शना खाली माजलगाव विधानसभा मतदारसंघाचे भाजपा नेते रमेशराव आडसकर यांच्या सुचनेवरुन माजलगाव शहरातील  हनुमान मंदिरा समोर घंटानाद आंदोलन करण्यात आले आहे.
यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष अरुण राऊत,बबनराव सोळंके,हनुमान कदम,शहराध्यक्ष अँड सुरेश दळवे,नगरसेवक ईश्वर होके ,विनायक रत्नपारखी,बबनराव सिरसट,डॉ भगवानराव सरवदे,प्रशांत पाटील,सत्यनारायण उनवणे,दत्ता महाजन,मनोज फरके,विजय रांजवण,पवण मोगरेकर,अर्जुन पायघन,नामदेव मुळे,आदित्य कुलकर्णी ,बाळासाहेब धपाटे,शेख शहबाज,मल्हारी ढगे,राम शिंदे ,शुभम भुरकवडे यांच्या सह शक्तिप्रमुख,बुथप्रमुख,भाजप कार्यकर्ते उपस्थित होते.

No comments