Breaking News

चकलंबा कंटेनमेंट झोन घोषित : संचारबंदीचे तालुका दंडाधिकारी यांनी दिले आदेश

गेवराई : तालुक्यातील चकलंबा येथे कोरोना बाधित रूग्ण आढळून आल्याने गाव अनिश्‍चित कालावधीसाठी कंटेनमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आले असून पूर्णवेळ संचारबंदी लागू करण्यात आली आहे. तसे आदेश तालुका दंडाधिकारी  यांनी नुकतेच दिलेत.

चकलांबा ठाण्यात दोन आरोपी वाळु चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. आरोपींना न्यायालयीन कोठडी मिळाल्यानंतर कारागृहात विलिगीकरण वार्डात दाखल करण्या आगोदर त्यांची कोरोना टेस्ट घेण्यात आली .सदर आरोपी पाॅझिटिव्ह आल्यानंतर त्यांच्या संपर्कात
चकलांबा पोलीसल ठाण्याती १४ पोलीस कर्मचारी यांची कोरोना चाचणी  करण्यात आली  या चाचणीत  पहील्या दिवशी सात व दुसऱ्या दिवशी चार असे अकरा पोलीस पॉझीटिव्ह आले .आज  गावांमध्ये येणारे सर्व रस्ते जेसी बी च्या साहाय्याने बंद करण्यात आले आहे यावेळी गावचे सरपंच सुरेश जाजु ग्रामविकास अधिकारी सरग साहेब, सहयाक पोलीस निरीक्षक मुंढे साहेब ,उगलमुगले साहेब, कर्मचारी व ग्राम सुरक्षा दलचे सदस्य आकाश खेडकर , अशोक गुंजाळ, राहुल रोकडे ,राजु शेख प्रत्रकार शेख सलमान आदी उपस्थित होते. 

No comments