Breaking News

सिंदफणा धरण ओवरफ्लो; शिरूर तालुक्याचा प्राणी प्रश्न मिटला नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा..!


बीड :  यंदा बीड जिल्ह्यात पावसाने दमदार हजेरी लावल्याने जिल्ह्यातील बहुतांश प्रकल्प ओवरफ्लो झाली आहेत. जिल्ह्यातील शिरूर तालुक्यात सर्वात मोठे असलेल्या सिंदफणा धरण शंभर टक्के भरले असून सांडव्यावरून पाणी वाहू लागले आहे. धरण भरल्याने तालुक्याचा पाणी प्रश्न मार्गी लागला असून येथील बळीराजा ही सुखावला आहे. सध्या धरण क्षेत्रात पावसाची रिमझिम सुरूच असल्याने सिंदफणा नदीकाठच्या गावांना तालुका प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा  देण्यात आला आहे. 

बीड जिल्ह्यातील शिरूर कासार तालुका दुष्काळग्रस्त तालुका म्हणून ओळखला जातो. यंदा मात्र या तालुक्यात समाधानकारक पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे येथील बळीराजा आनंदीत झाला आहे. तालुक्यातील सर्वात मोठा प्रकल्प असलेल्या सिंदफणा  धरण यंदा शंभर टक्के भरले असून मोठ्या सांडव्यावरून पाणी वाहू लागले आहे. पाणीपुरवठा करणारं धरण ओसंडून वाहत असल्याने नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. गेल्या काही वर्षांपासून धरणात पाणी साठा कमी असल्याने येथील पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला होता. परंतु आता धरण भरल्याने तालुक्याचा पाणीप्रश्न मार्गी लागला असून सध्या धरण क्षेत्रात पावसाची रिमझीम सुरूच असल्याने सिंदफणा नदीकाठच्या गावांना तालुका प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

No comments