Breaking News

किरण मुळेचं मुर्शदपुरकरांमधून केलं जातंय कौतुक.....

कोरोनावरील जागृतीचा देखावा करुन केली श्रींची प्रतिष्ठापना

के. के. निकाळजे । आष्टी
सध्या हॉस्पिटलमध्ये 24तास आपल्यासाठी लढणाऱ्या प्रत्येक हिरकणी ला मानाचा मुजरा,कोरोना एक अशी शर्यत जिथे धावणारा नाही थांबणारा जिंकेल आपण थांबूया जिंकूया.या सह अनेक सामाजिकतेचे संदेश देणारी देखणी आरास तयार करुन किरण मुळे या युवतीने पारंपारिक पद्धतीने गणपती बाप्पाची स्थापना केलेली आहे.तीने सामाजिक भान राखून केलेला देखावा मुर्शदपूरकरांसाठी कौतुकाचा विषय बनला आहे.

आष्टी शहराचे उपनगर असलेल्या मुर्शदपूर येथील पंचायत समिती सदस्य अशोक मुळे यांची कन्या कु.किरण मुळे हिने पारंपरिक पद्धतीने घरच्याघरीच श्रींची स्थापना अत्यंत साध्या पद्धतीने माञ त्याला जुन्या रुढी परंपरेचा बाज दाखवत केलेली आहे.विशेष म्हणजे या माध्यमातून कसल्याच प्रकारचे डिजीटल साहित्य न वापरता तसेच प्रदुषण विरहित अशा सामाजिक संदेश देणा-या फलकांच्या माध्यमातून तीने बाप्पांचे घडविलेले दर्शन आष्टीकरांसाठी मोठा चर्चेचा विषय ठरलेले आहे.हुबेहूब शेतक-यांची सद्यस्थितीत असलेली व्यथा,कोरोनाच्या महामारीत वैद्यकीय सेवा देणारे कर्मचारी,वृक्षसंगोपनाचे महत्व अशा एक न अनेक गोष्टींचे दर्शन तीने देखाव्यातून मांडले आहे.शेतकरी सुखी तर जग सुखी,बळीराजाला आत्महत्येपासून रोखू या,इतना ही लो थाली मे व्यर्थ ना जाये नाली मे
,ज्या घरी मुलगी आली समजा स्वतः लक्ष्मी आली,अंगणी लावा एकच तुळस प्राणवायूचा होईल कळस,नेहमी हात धुवा स्वच्छता राखा काळजी घ्या आणि टकाटक रहा,विनाकारण प्रवास करणे टाळा,घरी रहा सुरक्षित रहा,झाडांना नका करू नष्ट श्वास घेताना होईल कष्ट असे फलकही तीने यामध्ये साकारले असल्याने तीच्या या पारंपरिक गणेश भक्तीचे सध्या कौतुक केले जात आहे.

No comments