Breaking News

आ. विनायक मेटे तांबडीच्या चिमुकलीला न्याय देण्यासाठी आक्रमक


पीडित कुटुंबियांच्या भेटीनंतर शिष्टमंडळ उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री देशमुखांना भेटले

'फास्ट ट्रॅक कोर्टात केस चालणार; तपासात कच्चे दुवे राहणार नाहीत याबाबत वरिष्ठ पोलिसांना सक्त सूचना करू'

उपमुख्यमंत्री अजित दादा, गृहमंत्री अनिल देशमुखांनी दिले आश्वासन
मुंबई :   तांबडी, ता.रोहा, जिल्हा रायगड येथे कोपर्डीच्या घटनेप्रमाणेच पुनरावृत्ती झाल्याचा माणुसकीला काळिमा फासणारा प्रकार घडला आहे. येथील १४ वर्षाच्या चिमुकलीची काही विक्रुत मनोवृत्तीच्या लोकांनी अत्याचार करुन हत्या केली. त्याप्रसंगी पीडित कुटुंबीयांना धीर देण्यासाठी आणि सांत्वन करण्यासाठी परवा शिवसंग्राम संस्थापक अध्यक्ष तथा मराठा समन्वय समितीचे अध्यक्ष आ विनायक मेटे यांनी भेट घेतली होती. याप्रकरणी पोलीसांनी तात्काळ चार्जशीट दाखल करुन हे प्रकरण ऍड उज्वल निकम यांच्या मार्फत फास्ट्रॅक कोर्टात लढून सदर गुन्हेगारांना फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी करणारे निवेदन घेऊन काल आ विनायक मेटे यांनी शिष्टमंडळासह उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री अनिल देशमुखांची भेट घेतली.
दोन्ही वरिष्ठ मंत्र्यांनी सदर प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवू, तपासात कच्चे दुवे राहणार नाहीत याबाबत वरिष्ठ पोलिसांना सक्त सूचना करू व हि केस ऍड उज्वल निकम यांच्याकडे देण्याबाबत लवकरच निर्णय घेतला जाणार असल्याचे आश्वासन शिष्टमंडळास दिले आहे. तांबडी बुद्रुक येथील पीडित कुटुंबीयांची भेट घेतल्यानंतर आ विनायक मेटे हे आक्रमक झाले असून कोपर्डीची पुनरावृत्ती करणाऱ्या या प्रकरणात पीडित चिमुकलीस न्याय मिळवून देण्याबाबत कुटुंबियांना दिलेल्या आश्वासनाप्रमाणे त्यांनी तात्काळ उपमुख्यमंत्री अजित पवार व गृहमंत्री अनिल देशमुख यांची भेट घेतली.
       उपमुख्यमंत्री अजित दादा व गृहमंत्री अनिल देशमुख या दोघांनाही त्यांनी झालेल्या दुर्दैवी घटनेची माहिती देऊन कुटुंबीय व मराठा क्रांती मोर्चा, रोहाकडून करण्यात आलेल्या मागण्यांबाबत माहिती देत हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून माणुसकिला काळिमा फासणाऱ्या नराधमांना तात्काळ शिक्षा करण्यात यावी, ऍड उज्वल निकम यांच्याकडे याचे वकीलपत्र द्यावे, राज्यात असे प्रकार पुन्हा - पुन्हा घडू नयेत व अशी मानसिकता असणाऱ्या नराधमांना फाशीची शिक्षा देऊन धडा शिकवावा अशी मागणी आ विनायक मेटे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने निवेदनाद्वारे उपमुख्यमंत्री अजित दादा व गृहमंत्री देशमुखांकडे केली. यावेळी उपमुख्यमंत्री अजित दादा व गृहमंत्री अनिल देशमुखांनी हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवू, तपासकामाबाबत कसलेही कच्चे दुवे राहणार नाहीत याबाबत तेथील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बोलणे झाले आहे, चार - दोन दिवसांत ऍड उज्वल निकम यांच्याशी बोलून हि केस त्यांनी लढावी याबाबत प्रयत्न करण्यात येणार असल्याचे आश्वासन दिले आहे.

No comments