Breaking News

शिवसंग्रामच्या दणक्याने दुधाची भूक ताकावर भागविण्याचा नगरपरिषदेकडून प्रयत्न


मुरूम टाकून खड्डे बुजवण्यापेक्षा रस्ते करा, बीडकरांना पर्मनंट सोल्युशन द्या  - अक्षय माने

बीड :  गेल्या ५ वर्षांपासुन बीड नगरपरिषद, नगराध्यक्ष अन उपनगराध्यक्ष यांच्या आडमुठ्या धोरणामुळे शहराची दुरवस्था झालेली आहे. एकाच कामाचे ४-५ वेळा उदघाटन करून नुसता देखावा करण्यात सत्ताधारी क्षीरसागर कुटुंबीय पुढे आहेत. शहरातील नागरिकांमध्ये प्रचंड संताप असून कोणत्याही कामाचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न करणाऱ्या मात्र प्रत्यक्षात काहीही काम न करणाऱ्या नगराध्यक्ष, उपनगराध्यक्षांच्या कार्यपद्धतीचा निषेध करत आज शिवसंग्राम विद्यार्थी आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष अक्षय माने यांच्या नेतृत्वाखाली चिखल पूजन करण्यात आले होते. या चिखलपूजेनंतर काल बीड स्व शिवाजीराव धांडे नगर, पालवण चौक परिसर व इतर भागात खड्डे, चिखल असणाऱ्या ठिकाणी मुरूम टाकून खड्डे व चिखल कमी करण्याचा प्रयत्न केला जात असून मुरूम टाकून खड्डे बुजवण्यापेक्षा रस्ते करा, बीडकरांना पर्मनंट सोल्युशन द्या असे शिवसंग्राम विद्यार्थी आघाडी जिल्हा उपाध्यक्ष अक्षय माने यांनी म्हंटले आहे.  
    खड्डे, चिखलामुळे विशाल धांडेंना जीव गमवावा लागला अजून किती जीव घेणार नगरपरिषद? आहे का असा सवाल अक्षय माने यांनी उपस्थित केला आहे. या रस्त्यावर लोकांचे मनके राहत नाहीत, हाडांचे आजार वाढले आहेत. याचे सत्ताधारी क्षीरसागर कुटुंबीयांना काहीएक देणेघेणे नसून सर्व सत्तात आपल्याच घरात ओढलेले क्षीरसागर आता निर्ढावले आहेत.शहरातील रस्त्यांची दुरावस्था हटवून ज्या ठिकाणी ड्रेनेजचे काम सुरु आहे त्या ठिकाणी तात्काळ काम सुरु करून चिखल दूर करावा यासाठी शिवसंग्रामकडून स्व शिवाजीराव धांडे नगर येथे जिल्हाध्यक्ष सुधीर काकडे, युवक जिल्हाध्यक्ष रामहरी मेटे, तालुकाध्यक्ष नवनाथ प्रभाळे यांच्या मार्गदर्शनाखाली चिखलपुजन करण्यात आले होते. या पूजेनंतर शिवसंग्रामच्या दणक्याने दुधाची भूक ताकावर भागविण्याचा नगरपरिषद प्रयत्न करत असून मुरूम टाकण्याचे काम सुरु आहे. शहरातील लोकांना पर्मनंट सोल्युशन द्यावे, मुरुमांवर भागविणे थांबवा असे आवाहन अक्षय माने यांनी म्हंटले आहे.


मुरूम टाकणारे टिप्पर रस्त्यावरच फसले; आता तरी नगराध्यक्षांना लोकांना होणारा त्रास कळेल का? - अक्षय थोरात
बीड शहरात काल पालवण चौक येथे मुरूम टाकण्यासाठी आलेले टिप्पर देखील रस्त्यावरच फसले. रस्त्याची हालत इतकी खराब झाली आहे कि ऐन रस्त्यावरच टिप्परची टायर रुतु लागली आहेत. दोन जेसीबीच्या सहाय्यांने हे टिप्पर काढण्यात आले. नगराध्यक्षांनी यावरून तरी बीड शहरातील रस्त्याचे हाल कळून घ्यावेत अन्यथा बीडकर येणाऱ्या निवडणुकीत जाब विचारणारच आहेत.  

No comments