Breaking News

छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटवणाऱ्या कर्नाटक सरकारचा शिवक्रांती संघटनेच्या वतीने तीव्र निषेध - गणेश बजगुडे पाटील


बीड : अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत विश्ववंद्य छत्रपती शिवाजी महाराज यांचा बेळगाव येथील पुतळा काढून कर्नाटकातील भाजप सरकारने तमाम शिवप्रेमींच्या भावना दुखवून शिवरायांचा अवमान केलेला आहे.
   एकीकडे देशात "घेवु शिवछत्रपतींचा आशीर्वाद, देवु मोदींना साथ" आश्याप्रकरे शिवप्रेमींची दिशाभूल करत शिवाजी महाराजांच्या नावाने व आशीर्वादाने देशात सत्तेत आलेल्या भारतीय जनता पक्षाला बेळगावात शिवरायांची ऑलार्जी का ? छत्रपती शिवाजी महाराजांनी तंजावर पासून काबुल पर्यंत अटकेपार झेंडा उभारून स्वराज्याची स्थापना केली. सर्वांना न्याय, हक्क व समान अधिकार व वागणूक दिली. त्यांचे कार्य जाती, धर्म, पंथाच्या पलीकडे असून विश्वाला वंदनीय आहे. कुठल्याही जाती, भाषा किंवा राज्यापूर्ते मर्यादित त्यांना करू नये. हिंदुत्वाचे धडे गिरवत व छत्रपतींच्या आशीर्वादाने सत्तेत आलेल्या भारतातच आशे प्रकार घडत असतील तर ते अतिशय निंदनीय व खेदजनक असून कर्नाटकच काय जगात कुठेही शिवाजी महाराजांचा अवमान आम्ही कदापि सहन करणार नाहीत. झालेल्या सर्व प्रकारचा शिवक्रांती संघटनेच्या वतीने निषेध करून त्याठिकाणी पुन्हा सन्मानाने पुतळा बसविण्यात यावा व आश्या प्रकारचे कृत्य यापुढे कोणीही करू नये असे आवाहन शिवक्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष गणेश बजगुडे पाटील यांनी केले आहे.

No comments