Breaking News

गॅस टँकरच्या धडकेत दुचाकीस्वार ठार


पाटोदा : भरधाव वेगाने निघालेल्या एका गॅस टँकरने दुचाकीला जोराची धडक देवून झालेल्या भीषण अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना पाटोदा तालुक्यातील कोतन जवळ घडली. हा अपघात 
एवढा भीषण होता की, दुचाकीस्वराच्या डोक्याचा चेंदामेंदा झाला होता. दरम्यान अपघातानंतर टँकर चालक घटनास्थळावरून पसार झाला होता. परंतू, पोलिसांनी त्याला हातोला चेकपोस्ट वर ताब्यात घेतले. 


मिळालेल्या माहितीनुसार तालुक्यातील अंमळनेर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कोतन गावा नजीक भरधाव वेगाने निघालेल्या एचपी गॅस टँकरच्या दुचाकी ( एम. एच. २३ जी- 3283) जोराची धडक दिल्याने  दुचाकीस्वाराच्या डोक्याचा चेंदामेंदा होऊन त्याचा जागीचं मृत्यू झाला. अपघाताच्या घटनेनंतर टँकर चालकाने घटनास्थळावरून पळ काढला होता. परंतु माहिती कळताच अंमळनेर पोलीस ठाण्याचे शामकुमार डोंगरे यांनी तत्काळ सूत्रे हलवून हातोला चेक पोस्टवर  टँकर चालकाला ताब्यात घेतले. दरम्यान अपघातातील मयत दुचाकीस्वार कुठला आहे, कुठून कुठे जात होता. याचा शोध पोलीस घेतायत.

No comments