Breaking News

धुनकवाडच्या दलित वस्तीचा सिमेंट रस्ता गेला चोरीला? गावकारभाऱ्याच्या अंगणात थापली थातुरमातुर गच्ची


भ्रष्ट कारभाराची दबक्या आवाजात ग्रामस्थांमध्ये चर्चा

जगदीश गोरे । धारुर 

धारूर तालुक्यातील धुनकवाड येथे दलीत वस्तीमध्ये सिमेंट रस्त्याच्या कामाला मंजूरी मिळाली. मात्र हा सिमेंट रस्ता चोरीला गेल्याची ओरड गावात होऊ लागली. गावच्या कारभाऱ्याच्या अंगणात थातुरमातुर गच्ची थापली असून दलित वस्तीतील सिमेंट रस्त्यावर डल्ला मारणाऱ्यांच्या भ्रष्ट कारभाराची दबक्या आवाजात गावभर चर्चा होऊ लागली आहे. 
दलीत वस्तीत विकास व्हावा, यासाठी शासनाने समाज कल्याण विभागांतर्गत दलीत वस्ती सुधार योजना कार्यान्वित करण्यात आली. या योजनेतून ग्रामपंचायतीच्या मार्फत दलीत वस्तीत रस्ते, नाली, वीज, पाणी, सार्वजनिक शौचालय अशी अनेक कामे करण्यासाठी शासनाने लाखो रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला व तो निधी योग्य ठिकाणी खर्च करण्याचे आदेश दिले. मात्र दलित वस्तीचा विकास विकास कमी अन कारभाऱ्याचा विकासच मोठ्या प्रमाणात होऊ लागल्याचे दिसत आहे.
 सरपंचाच्या मनमानी कारभारामुळे हा निधी इतरत्र खर्च केला जात आहे, आशीच परिस्थिती धुनकवाड येथील सरपंचांनी निधी मंजूर केला सिमेंट रस्त्यासाठी इस्टीमेट बनवले सिमेंट रस्त्याचे अन् थापली थातुरमातुर गच्ची करून तब्बल तीन लाखांचा अपहार झाल्याचा आरोप ग्रामस्थ करत आहेत. गच्चीच काम ही
 निकृष्ट दर्जाचे काम केले असून मग सिमेंट रस्ता गेला कुठे असा प्रश्न ग्रामस्थांना पडला आहे. यामुळे ग्रामस्थांत एकच चर्चा सुरू झाली आहे की धुनकवाड येथील दलीत वस्तीमधील सिमेंट रस्ता चोरीला गेला आहे? यामुळे हा रस्ता चोरी गेल्याची तक्रार ग्रामस्था पोलीस ठाण्यात करणार आहेत अशी चर्चा दबक्या आवाजात होत आहे.
 जिल्हा परिषदेच्या वतीने दलीत सुधारणा योजनेसाठी देण्यात येणाऱ्या निधीचा योग्य ठिकाणी वापर व्हावा व तो निधी योग्य ठिकाणी खर्च व्हावा परंतु तसे होताना दिसत नाही ज्या कामात काम कमी व जास्त पैसे राहातील असे काम निवडायचे व ते करायचे अशी वृत्ती सरपंचाची आहे व दलीत वस्तीसाठी आलेल्या निधीचा गैरवापर धुनकवाड येथील सरपंचांनी केला आहे.तरी धुनकवाड येथील सिमेंट रस्ता चोरीला गेला आहे नाहीतर हा सिमेंट रस्ता दाखवावा व चौकशी करावी अशी मागणी ग्रामस्थांतून होत आहे.

No comments