Breaking News

तांबोळी युवा मंच ने पालीच्या तळ्यात सोडले मत्स्यबीज!




बीड :   शहरातील धडाडीचे सामाजिक कार्यकर्ते, साप्ताहिक उन्नती चे संपादक आणि तांबोळी युवा मंच चे जिल्हाध्यक्ष साजन रईस तांबोळी यांच्या वाढदिवसानिमित्त पालीच्या तळ्यात मत्स्यबीज सोडण्यात आले.
    यावेळी बोलताना साजन रईस चौधरी यांनी म्हटले की, मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून आतापर्यंत निर्माण झालेल्या कोरोना महामारी च्या परिस्थितीमुळे सर्वसामान्य, हातावर पोट भरणाऱ्या नागरिकांचे हाल होत आहेत. अनेक कुटुंबीयांना दोन वेळेस च्या जेवणाची भ्रांत निर्माण झाली आहे. अशा वातावरणात वाढदिवस आल्याने त्यानिमित्त वायफळ खर्चाला फाटा देवून, कुठलाही उधळपट्टीचा कार्यक्रम न घेता सर्वसामान्य नागरिकांना उपयोगी पडेल, असा कार्यक्रम घेण्याचे ठरवून वाढदिवसानिमित्त तांबोळी युवा मंच तर्फे पालीच्या तळ्यात मत्स्यबीज सोडले आहे. जेणेकरून याचा पुढे चालून सर्वसामान्यांना लाभ व्हावा. यावेळी तांबोळी युवा मंच चे पदाधिकारी आणि सदस्यांसह गब्बर तांबोळी, सलमान तांबोळी, शेख रेहान, शेख वासेख, शेख लईख आणि पत्रकार एस. एम.युसूफ उपस्थित होते.

No comments