Breaking News

नापिकीला कंटाळून साळेगावमध्ये शेतकऱ्याची आत्महत्या

केज : तालुक्यातील साळेगाव येथे एका तीस वर्षीय तरुण शेतकऱ्याने नापिकी आणि कर्जाला कंटाळून विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्या केली आहे.


या मिळालेल्या माहितीनुसार  साळेगाव ता. केज येथील तरुण शेतकरी राहुल श्रीमंत घाटूळे (वय ३० वर्ष) याने नापिकी आणि कर्जबाजारीपणा याला कंटाळून दि. ३ ऑगस्ट रोजी सकाळी १०:३० वा. च्या दरम्यान विषारी द्रव्य प्राशन केले. त्याच्यावर स्वामी रामानंद तिर्थ वैद्यकीय महाविद्यालय व ग्रामिण रुग्णालय अंबाजोगाई येथे उपचार सुरू असताना दि. ५ ऑगस्ट रोजी पहाटे ४:०० वा. च्या दरम्यान तरच मृत्यू झाला.
मयताची पत्नी पल्लवी राहुल घाटूळे हिच्या फिर्यादी वरून केज पोलीस स्टेशनला सीआरपीसी १७४ नुसार आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस नाईक अमोल गायकवाड हे करीत आहेत.

No comments