Breaking News

इमामपूर रोड कधी पूर्ण करायचा ? ३ महिन्यांपासून लोकांना त्रास का दिला जातोय

शिवसंग्रामच्या सातिराम ढोले यांचा सवाल
बीड  :  बीड शहरातील बार्शी नाका नजीक असलेल्या इमामपूर रोडवर गेल्या ३ महिन्यांपासून काम ठप्प आहे. या ठिकाणी सुरु असलेल्या अंडरग्राउंड ड्रेनेजचे काम आतापर्यंत संपविणे अपेक्षित असताना देखील कामामध्ये प्रचंड विलंब केला जात आहे. हे काम कधी पूर्ण होणार आहे? या ठिकाणी असलेली यंत्रसामग्री अद्याप बाजूला न केल्याने पायी जाणे देखील शक्य नाही, नेमके किती दिवस येथील लोकांना त्रास द्यायचा आहे असा सवाल शिवसंग्राम नेते सातिराम ढोले यांनी केला आहे.

शहरातील रस्त्याचे अन अंडरग्राउंड ड्रेनेजचे काम हे गेल्या काही वर्षांपासून सुरु आहे. या कामाला सुरु केल्यापासून आतपर्यंत सर्व काम संपवायला पाहिजे होती मात्र नगराध्यक्ष अन स्थानिक आमदारांच्या दुर्लक्षामुळे बीडकरांना प्रचंड हाल सोसावे लागत आहेत. आगामी निवडणुकीत या बीडकरांना दिलेल्या त्रासाचे उत्तर मतातून नक्कीच देतील. गेल्या ३ महिन्यांपासून अंडरग्राउंड ड्रेनेजचे काम इमामपूर रोडवर सुरु आहे. येथे चालण्यापुरता देखील रस्ता ठेवण्यात आला नसून २ दिवसात जर हे काम सुरु करून लवकरात लवकर पूर्ण केले नाही तर शिवसंग्राम या ठिकाणी बोंब मारो आंदोलन करणार असल्याचे शिवसंग्राम युवा नेते सातीराम ढोले यांनी इशारा दिला आहे. 


No comments