Breaking News

केजमध्ये भाजप कार्यकर्त्यांनी घंटा वाजवत सरकारचा केला निषेध


गौतम बचुटे । केज 

केज तालुका भारतीय जनता पार्टिच्या वतीने केज शहरात हनुमान मंदीर समोर राज्यातील करोडो लोकांची श्रद्धांस्थान असलेली देवस्थान, मंदीर, धार्मिक स्थळे बंद आहेत. ती खुली करावीत. या प्रमुख मागणीसाठी तालुका अध्यक्ष भगवान केदार यांच्या नेतृृृत्वाखाली घंटानाद आंदोलन करण्यात आले.
यावेळी संबळ, घंटा वाजवून राज्य सरकारच्या विरोधात प्रचंड घोषणाबाजी करण्यात आली. राज्यात दारूची दुकाने चालु आहेत. मात्र मंदीरे बंद या घटनेचा निषेध करत सरकारच्या विरोधात तिव्र भावना भाजपा कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्या. या वेळी रमाकांत मुडे, जि. प. सदस्य विजयकांत मुंडे, सभापतीचे पती विष्णू घुले, सुरेंद्र तपसे, दत्ता धस, सुनील घोळवे, डॉ. वासुदेव नेहरकर, महादेव सुर्यवंशी, संभाजी गायकवाड, शेषेराव कसबे, अतुल इंगळे, राहुल गदळे, धनंजय घोळवे, योगेश शिंदे, संतोष देशमुख, बंडु गदळे, दिनकर चाटे, विक्रम डोईफोडे, बंडु शिंदे, दत्ता इंगळे, सोनु सावंत, अर्जुन बनसोडे, अगंद मुळे, साहेबराव नवगिरे, रमेश बिक्कड, चंदु मिसाळ, बाळासाहेब चंदनशिव, पाडुरंग भांगे, सचिन लोंढे, धनराज लाटे, नवनात सावंत, दादासाहेब कराड व अशोक राख यांच्यासह अनेकजण उपस्थित होते.

No comments