Breaking News

अश्लिल फोटो व्हायरल करण्याची धमकी देवून अल्पवयीन मुलीचा केला विनयभंग


वडवणी पोलीस ठाण्यात नराधमाविरुद्ध गुन्हा दाखल

वडवणी : प्रात: विधीसाठी निघालेल्या अल्पवयीन मुलीस वाटेत गावातील तीन तरूणांनी अडवून एकाने तिला जबरदस्तीनं रस्त्यालगत असलेल्या वीटभट्टीच्या खोलीत नेले. तिथं तिच्यासोबत अश्लिल चाळे करत त्याचे मोबाईलमध्ये फोटो काढले. घडला प्रकार कोणाला सांगितलं तर मोबॉईल मधील फोटो व्हायरल करील अशी धमकी त्यानं तिला दिली. ही धक्कादायक घटना वडवणी तालुक्यातील उपळी येथे घडली.

मिळालेल्या माहितीनुसार वडवणी तालुक्यातील उपळी गावातील १६ वर्षीय मुलगी शौचालयला जात असताना गावातील तीन युवकांनी तिला रस्त्यात आडविले. तसेच शाळेजवळील असलेल्या वीटभट्टीच्या रूममध्ये तिला घेऊन जात तिच्याशी अश्लिल चाळे करत जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान याबद्दल कोणाला काही सांगितले तर तुझे मोबाईल मधील अश्लिल चाळे करतानांचे सेल्फी फोटो काढलेले सगळ्यांना दाखवेल.अशी धमकी देऊन आरोपी फरार झाला. मात्र मुलीने हिम्मत घडलेल्या प्रसंगाची घरी येऊन हकीकत आपल्या आईला सांगितली. आईने तात्काळ वडवणी पोलीस ठाणे गाठत आरोपी राजेश उद्धव नाटकर, नामदेव केरबा आगवाणे, दीपक बापुराव माळी सर्व राहणार उपळी यांच्याविरोधात पीडित मुलीच्या आईच्या फिर्यादीवरून गुरनं १८०/२०२०, कलम ३५४,५०६,३४ भा.द.वि.सह कलम ८,१२ पोक्सो २०१२ प्रमाणे आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास एपीआय महेश टाक करत आहेत.

No comments