Breaking News

त्या अनोळखी इसमाचा उपचारा दरम्यान मृत्यू


गौतम बचुटे । बीड 
 बीड हद्दीतील नामलगाव फाटा येथील पुलाखाली आजारी अवस्थेत आढळून आलेल्या एका अनोळखी वृद्धाचा जिल्हा रुग्णालयात उपचारा दरम्यान मृत्यू झाला असून त्याची ओळख पटविण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.


या बाबतची माहिती अशी की, दि २२ ऑगस्ट रोजी बीड ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीत नामलगाव फाटा येथील पुलाखाली ७० वर्ष वयाचा अनोळखी वृद्द पुरुष आजारी होता. त्याचेवर जिल्हा रुग्णालय बीड येथे उपचार सुरू असताना
उपचारा दरम्यान त्याचा मृत्यू झाला. त्या अनोळखी इसमाचे वय ७० वर्ष, बांधा सडपातळ, चेहरा उभट पांढरे केस व वाढलेली दाढी, अंगात मळकट व फाटके कपडे असा वेष आहे. सदर मयत इसमा बाबत कुणाला माहिती किंवा ओळख असेल तर त्यांनी ग्रामीण पोलीस स्टेशन बीड येथे माहिती द्यावी किंवा सहाय्यक पोलीस निरीक्षक बडे, पोलीस निरीक्षक सुरेश माळी यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन पोलीसांनी केले आहे.

No comments