Breaking News

बीडच्या सेवानिवृत्त पोलिस उप निरीक्षकाने कोरोनावर केली मात

बीड : एका 75 वर्षीय सेवा निवृत्त पोलिस उपनिरिक्षक यांनी कोरोनावर मात केल्यानं त्यांचं परिसरातील लोकांनी अभिनंदन करून स्वागत केलं.

शहरातील स्नेह नगर येथील 75 वर्षीय उत्तमराव लालाराव सवाई हे बीड जिल्हा पोलिस दलातून पोलीस उप निरीक्षक पदावरून सुमारे वीस वर्षांपूर्वी सेवानिवृत्त झाले आहेत. उत्तमराव सवाई यांना हाय बीपीचा त्रास असून त्यांच्यावर बायपासची  शस्त्रक्रिया सुद्धा झाली आहे. बीड शहरात कोव्हीड-१९ च्या रुग्ण संख्येत वाढ होत असताना सवाई यांना ही  कोरोनाची लागण झाली. उपचारासाठी त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. कोरोना विषाणूला न घाबरता त्याच्याशी झुंज देत या 75 वर्षीय तरुणानं स्वातंत्र्य दिनी कोरोनाला हरवून कोरोना विषाणू वर मात करून ते सुखरुप घरी परतले आहेत. यावेळी त्यांचे घरच्या मंडळीसह परिसरातील नागरीकांनी त्यांचे अभिनंदन करून स्वागत केलं. 

No comments