Breaking News

सुहास डोरले यांची उत्कृष्ट तलाठी म्हणून निवड

गौतम बचुटे । केज
केज तहासिलचे तलाठी सुहास डोरले यांची उत्कृष्ट तलाठी पुरस्कारासाठी निवड झाली आहे.

केज तहसिलचे तलाठी सुहास डोरले यांची केज तालुक्यातून जिल्हास्तरावर तलाठी संवर्गासाठी  प्रतिष्ठेचा समजल्या जाणाऱ्या उत्कृष्ठ तलाठी म्हणून पुरस्कारासाठी निवड झाली आहे. हा पुरस्कार जिल्हाधिकारी यांच्या हस्ते सन्मान पत्र देऊन केला जातो.
सुहास डोरले हे प्रथम साळेगाव येथे प्रशिक्षणार्थी तलाठी म्हणून रुजू झाले व त्या नंतर नियमित तलाठी म्हणूनही त्यांनी साळेगाव आणि सज्जात सेेवा केली आहे. डोरले यांनी एलएलबी ही कायद्याची 
पदवी मिळविलेली असून संगणक विषयी व आधुनिक कार्यप्रणाली या बाबतची त्यांना अधिक माहिती आहे. ते शेतकरी व नागरिकांशी कर्तव्य तत्पर भावनेने सेवा करीत आहेत.
त्यांच्या या निवडी बद्दल तहसीलदार दुलाजी मेंढके, नायब तहसीलदार आशा वाघ, नायब तहसीलदार सचिन देशपांडे, मंडळ अधिकारी बाबुराव दळवे, भागवत पवार, लहू केदार, बाळासाहेब फरके, पेशकार पठाण साहेब, इंगळे, मन्मथ पटणे, धुमक, त्यांचे सहकारी इनामदार साहेब, बापू देशमुख यांच्यासह साळेगाव येथील ग्रामस्थांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

No comments