Breaking News

फुले -आंबेडकरी अभ्यासकचे इंजि.भगवान साकसमुद्रे यांच्यावर प्राणघातक हल्ला

हल्लेखोर भाजपा न.प.गटनेता सचिन कागदेसह पाच जणांवर पोलिसात गुन्हा दाखल 

परळी : येथील सामाजिक कार्यकर्ते तथा फुले-आंबेडकरी अभ्यासक संघटनेचे इंजि. भगवान साकसमुद्रे यांच्यावर सात ते आठ जणांनी संगनमत करत तलवार व लाथा बुक्याने मारहाण करून प्राणघातक हल्ला केल्याची घटना गुरुवारी 
दुपारी २:३० च्या सुमारास घडली. या प्राणघातक हल्यात साकसमुद्रे गंभीर जखमी झाले असून उपचारासाठी त्यांना अंबाजोगाई च्या स्वा.रा.ति.रूण्णालयात दाखल करण्यात आले आहे.  याप्रकरणी हल्लेखोरांवर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून हल्लेखोर भाजपचे न. प. गटनेते सचिन कागदे यांचा यात समावेश असल्याचे समजते.


मिळालेल्या माहितीनुसार महाराष्ट्रात फुले- शाहू- आंबेडकर अभ्यास संघटनेचे कार्यकर्ते म्हणून इंजि. भगवान साकसमुद्रे परिचित आहेत. गुरुवारी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास परळी शहरातील बाळकृष्ण रोडे चौकात साकसमुद्रे बापू गायकवाड,रमेश सरवदे मित्रांशी बोलत असताना अचानक त्याठिकाणी भाजपाचे न.प.गटनेता सचिन कागदे यांनी  भगवान साकसमुद्रे यांना शिवीगाळ करत थांब तुझी बघतो अशी धमकी देत दुपारी २:३० वाजण्याच्या  सुमारास सचिन ईश्वर कागदे, राहूल ईश्वर कागदे, शरण ताटे व अन्य पाच-सहा जणांनी संगनमत करत तलवारीने व लाथा बुक्यांनी भगवान साकसमुद्रे यांना मारहाण केली. या प्राणघातक हल्लयामध्ये साकसमुद्रे गंभीररीत्या जखमी झाले असून तत्काळ त्यांना उपचारासाठी त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांना परळी येथील जिल्हा उपरुग्णालयात दाखल केले .परंतु त्याच्यावरील गंभीर वार व खूप रक्तस्राव झाल्याने त्यांना स्वा.रा.ति.अंबाजोगाई येथे हलवण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान हल्लेखोर सचिन ईश्वर कागदे ,राहूल ईश्वर कागदे,शरण ताटे व इतर सहा जणांवर भादंवि ३०७, ४४१,  ५०४, ५०६ आपती व्यवस्थापन ५१ ब, महाराष्ट्र कोविड नियम ११ अशा कलमान्वये संभाजी नगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक चांद मेंढके हे करत आहेत.

दरम्यान इंजि. भगवान साकसमुद्रे हे संपूर्ण महाराष्ट्राला फुले शाहू आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते म्हणून परिचित आहेत त्यांच्यावरील हल्ल्यामूळे सर्वत्र संताप व्यक्त होत असून हल्लेखोरांना तात्काळ अटक करण्याची मागणी होत आहे.

No comments