Breaking News

सौरभ गांगुलीने ममता सरकारची जमीन केली परत !


कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये पुढील वर्षी विधानसभा निवडणूक होणार आहे. बंगाल भाजप मुख्यमंत्रीपदासाठी लोकप्रिय चेहऱ्याच्या शोधात आहे. अशातच बीसीसीआयचे अध्यक्ष आणि टीम इंडियाचे माजी कर्णधार सौरभ गांगुली भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचा अंदाज राजकीय विश्लेषकांमधून बांधला जात आहे.

ममता सरकारने बंगालच्या न्यू टाऊनमध्ये आयसीएससी बोर्डाच्या बारावीपर्यंतच्या शाळेसाठी सौरभ गांगुली यांना जमीन दिली होती. परंतु नुकतंच त्यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची त्यांच्या कार्यालयात भेट घेतली आणि शाळेसाठी दिलेली दोन एकर जमीन परत केली. भाजपमध्ये जाणार असल्याने गांगुली यांनी हा निर्णय घेतल्याची अटकळ बांधली जात आहे. परंतु गांगुली मला राजकारणात रस नाही, असे सौरभ गांगुली यांनी अनेक वेळा स्पष्ट केले आहे.

No comments