Breaking News

इंजि. साकसमुद्रे हल्ला प्रकरणी एकास अटक


परळी :  फुले -शाहू -आंबेडकरी अभ्यासक तथा मुक्त पत्रकार इंजि.भगवान साकसमुद्रे हल्ला प्रकरणी संभाजीनगर पोलिसांनी शरणम ताटे यांना अटक केली असून परळी न्यायालयाने  31 ऑगस्ट  पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. 

   येथील इंजि. भगवान  साकसमुद्रे यांच्यावर 6  ऑगस्ट  रोजी  प्राणघातक हल्ला झाला होता. याप्रकरणात आतापर्यंत संभाजीनगर पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. तर कार्तिक कांबळे, संतोष पिसे आणि भीमा पौळे यांच्यावर बीड एलसीबीने प्रतिबंधात्मक कारवाई केली. 
   या  हल्ल्यातील शरणम ताटे यांना काल संभाजीनगर पोलिसांनी अटक केली. त्यास  परळी न्यायालयात हजर केले असता परळी न्यायालयाने  31  ऑगस्ट  पर्यंत पोलिस कोठडी  सुनावली. हल्ल्यातील आरोपी नगरसेवक  सचिन कागदे  व राहुल कागदे  हे घटना घडल्यानंतर  25  दिवस  झाले  तरी  अद्याप फरार आहेत. त्यांची  पार्श्वभूमी गुंडगीरीची आहे .या प्रकरणी पो. नि. बी एन पवार, तपास अधिकारी IO चांद मेंडके हे करत आहेत तरी लवकरात लवकर अटक करावे अशी मागणी निवेदनाद्वारे विविध संघटनांनी  केली आहे.

No comments