Breaking News

गणेशत्सावाच्या दृष्टीने सहा शहरासाठीचे निर्बंध शिथील


बीड- माजलगाव- परळी- अंबाजोगाई -केज व आष्टी या शहरात श्रीगणेश मूर्ती व हार-फुलांची दुकाने सुरू ठेवण्यास परवानगी

बीड : गणेशत्सावाच्या दृष्टीने बीड, माजलगाव, परळी, अंबाजोगाई, केज व आष्टी या शहरासाठीचे निर्बंध शिथील करण्यात येत आहेत. परंतु केवळ 02 फूट उंची पर्यंतच्या श्रीगणेश मूर्तीच्या दुकाने, फळे, भाजीपाला, दुध, मेडिकल, पूजेच्या साहित्यांची दुकाने व हार-फुलांची दुकाने या सर्व साहित्याची घाऊक व किरकोळ विक्रीची दुकाने सुरू ठेवण्यास परवानगी दिली आहे.

तसेच  कोरोना विषाणू संसर्ग मुळे शहरामधील गर्दी नियंत्रीत करणे आवश्यक त्यासाठी शहरातील, गावातील वेगवेगळया ठिकाणी संपूर्ण पसरलेली राहतील आणि एकाच ठिकाणी, रस्त्यावर राहणार नाहीत याची जबाबदारी संबधित नगर परिषद, नगर पंचायत, ग्रामपंचायत यांची राहील असे आदेश अपर जिल्हादंडाधिकारी प्रवीण कुमार धरमकर यांनी दिले आहेत
परंतू यामध्ये सुशोभीकरणाची साहित्य विक्री दुकाने ,मिठाई दुकाने,हॉटेल रेस्टांरट यांना व इतर सर्व प्रकाराच्या दुकांनाना उघडण्यास परवानगी असणार नाही. या विषयीचे आदेश स्वतंत्रपणे देण्यात येतील.
सर्वांनी कोवीड-19 विषयक सर्व खबरदारीपाळूनच कामकाज करावे. तसेच वरील शहरांमध्ये ॲन्टीजेन टेस्टीची मोहिम चालू राहील त्यास सर्व व्यापाऱ्यांनी त्यास सहकार्य कारावे.
कन्टेनमेंट झोन मधील निर्बंध तसेच कायम राहतील. यापूर्वी कोरोना विषाणू रूग्णाची संख्या बीड जिल्हयात मोठया प्रमाणातवाढ होत असल्यामूळे बीड, अंबाजोगाई, माजलगाव, परळी, केज व आष्टीे शहरे  10 दिवसांकरीता दिनांक 21 ऑगस्ट2020 रोजी रात्री पर्यंत पूर्णपणे सर्व दृष्टीने बंद करण्यातआले होते परंतु गणेशत्सावाच्या दृष्टीने हे आदेश दिले आहेत
राज्य शासनाने कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथरोग प्रतिंबधात्मक कायदा 1897 दिनांक 13 मार्च 2020 पासून लागू करून खंड 2,3 व4 मधील तरतुदीनूसार अधिसूचना निर्गमित केलेली आहे.आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005मधील कलम 25 अन्वये जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्रधिकरणाची स्थापना करण्यात आलेलीआहे व त्यातील पोट कलम 2 (अ) नुसार जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडधिकारी हे उक्तप्रधिकरणाचे अध्यक्ष आहेत.
बीड जिल्हयात फौजदारी प्रक्रिया संहिताचे कलम 144(1)(3) अन्वये दिनांक 31 ऑगस्ट 2020 रोजीचे रात्री12.00 वा.पर्यंत मनाई आदेश लागू करण्यात आले आहेत. 

No comments