Breaking News

सामाजिक चळवळींनी बदलते संदर्भ तपासून लढा उभारण्याची गरज : प्रा. डॉ.मिलिंद आवाड

गेवराई :  बदलत्या काळानुसार आपण जनतेच्या प्रश्नाकडे पाहिले पाहीजे. बदलते संदर्भ घेऊन व्यापक चळवळ उभी करण्याची खरी गरज आज असून त्यानुसार लढा उभारला पाहिजे असं मत मानवी हक्क अभियानचे अध्यक्ष मिलिंद आवाड यांनी  व्यक्त केले.


रविवारी (दि.१६) मानवी हक्क अभियान संघटनेच्या झूम मीटिंगचे आयोजन संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा.डॉ. अध्यक्ष डाॅ. मिलींद आवाड यांच्या उपस्थितीत करण्यात आले होते.  या मीटिंगमध्ये सामाजिक, राजकीय आणि शैक्षणिक या प्रश्नाबरोबर जनतेच्या  विविध समस्यांवर चर्चा करण्यात आली.
याप्रसंगी श्री. आवाड  म्हणाले की, "मानवी हक्क अभियान संघटना मागील तीस वर्षापासुन जे प्रश्न हताळत आहे, ते प्रश्न आजही कार्यकर्ते सोडवताना आपण पाहत आहोत. या प्रश्नांना आजही नाकारता येत नाही. परंतु नव्याने बदलत्या काळानुसार आपण जनतेच्या प्रश्नाकडे पाहिले पाहीजे. बदलते संदर्भ घेऊन व्यापक चळवळ उभी करण्याची खरी गरज असल्याचे ते म्हणाले. यावेळी चर्चेत सहभागी झालेल्या कार्यकर्त्यांनी संघटना बांधण्यासाठी आपली मते मांडली.
          झूम अॅप वर घेण्यात आलेल्या बैठकीचे प्रस्ताविक या बैठकीचे संयोजक मानवी हक्क अभियान संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश सचिव कडूदास कांबळे यांनी केले. तर आभार नांदेड जिल्हा अध्यक्ष मच्छिंद्र गवाले यांनी मानले.

या बैठकीस राजेश घोडे बीड जिल्हाध्यक्ष , पप्पू शेळके परभणी जिल्हाध्यक्ष, मच्छिंद्र गवाले नांदेड जिल्हाध्यक्ष , अंकुश सोनवणे   जिल्हाध्यक्ष , भरत बळवंते हिंगोली जिल्हाध्यक्ष, दत्ता कांबळे, युवा जिल्हा उपध्यक्ष बीड राम  दादा वाघमारे, धोंडीबा हातागळे, भारत गायकवाड, दिगंबर विभुते, संतोष करवंदे, यशवंत फडतरे, साई गायकवाड अॅड. अंकुश कांबळे, दीपक भलेराव, देवीदास कांबळे, दिगंबर विभुते संघमित्रा गवळी, भीमराव बडकर, आकाश गाडे यांच्यासह बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

No comments