Breaking News

साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांना स्वातंत्र्यदिनी महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्यात यावा - सतीश कापसे


प्रति  - जिल्हाधिकारी मार्फत मुख्यमंत्री यांना निवेदन देवून साहित्य रत्न अण्णा भाऊ साठे यांना मरणोत्तर महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात यावे अशी मागणी बहुजन समाज पार्टी च्या वतीने बसपा जिल्हा प्रभारी सतीश कापसे बीड यांनी केली आहे.

 संयुक्त महाराष्ट्राच्या  चळवळीतील साहित्य रत्न अण्णा भाऊ साठे यांचे कार्य अमुलाग्र आहे. कथा, कांदबरी, पोवाडे, शाहीरी च्या माध्यमातून मानवी जीवनातील अमानवीय सत्यता आपल्या साहित्यातुन जगा समोर मांडणारे थोर समाज सुधारक, कामगाराच्या न्याय हक्कासाठी लढा देऊन  चळवळीला गती देणारे तसेच  ' ही पृथ्वी शेषनागाच्या मस्तकावर तरलेली नसुन श्रमीका च्या तळ हातावर तरलेले आहे ' असे सांगणारे अण्णा भाऊ साठे साहित्य क्षेत्रातील कोहिनूर आहेत 15ऑगस्टला भारत स्वातंञ झाला आणि 16ऑगस्टला  महाराष्ट्राच्या विधानभवनावर लाखो च्या संख्येने कामगाराचा मोर्चा काढुन ' ये आझादी झुटी हैं देश कि जनता भुकी हैं' चा नारा देवून लढा देणारे अण्णा भाऊ चे कार्य पाहून रशिया देशाने  ने देखील त्यांना सन्मानित केले.
माञ आजही महाराष्ट्र सरकारने त्यांना सन्मानित केल्याचे दिसून येत नाही. अण्णा भाऊ साठे यांचे महाराष्ट्रातलाखो च्या संख्येने चाहते आहेत. 1 ऑगस्ट अण्णा भाऊ साठे यांचे जन्म शताब्दी वर्ष आहे.
करिता साहित्य रत्न अण्णा भाऊ साठे यांना मरणोत्तर महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात यावे. अशी मागणी करण्यात येत आहे.यावेळी
बसपा जिल्हा प्रभारी सतीश कापसे,शेख अफसर ,संजय मिसाळ बसपा जिल्हा अध्यक्ष अॅड अमोल डोंगरे
अमर धुरंधरे, नितीन मुजमुले, हरिशचंदर रोकडे, रवि हातागळे, अजय हातागळे, लखन रोकडे, शेख अलिम, अनिल सिरसट, राहुल सिरसट, प्रदीप ससाणे यांनी मागणी केली आहे.

No comments