Breaking News

नायब तहसीलदार देशपांडेंची बदली करा: केजमध्ये शेकाप - शिवसंग्राम - रिपाईने प्रशासनाच्या विरोधात मारली बोंब


जर बदली झाली नाही तर विभागीय आयुक्त कार्यालयात ठिय्या आंदोलनाचा ईशारा

गौतम बचुटे । केज 
केज येथील नायब तहसीलदार  सचिन देशपांडे हे वीस ते पंचवीस वर्षां पासून केज येथील वेगवेगळ्या विभागात तर कधी नगरपंचायत मध्ये पदभार घेउन, राजकीय व्यक्तींच्या सोयी नुसार वागतात. त्याचा फायदा स्थानिक राजकारण्यांना होतो. त्यामुळे हे ठाण मांडे अधिकारी यांची बदली व्हावी. जिल्ह्यात नायब तहसीलदार, मंडळधिकारी, कारकून या संवर्गातील यांच्या बदल्या झाल्या असताना केज तहसील अंतर्गत नायब तहसिलदारासह तलाठी, मंडळ अधिकारी यांच्या बदल्या होणे अपेक्षित आहे. याबाबत काहींच्या तक्रारी असताना बदल्या का होत नाहीत? म्हणून दि. २४ रोजी केज तहसील कार्यालया समोर जिल्हाधिकारी यांच्या नावाने बोंबा मारो आंदोलन करण्यात आले.

शेकाप, शिवसंग्रामआणि रिपाई यांच्यासह मित्रपक्ष वंचित आघाडी, रिपब्लिकन सेना या संघटनानीही पाठिंबा दिला आहे.

अनेक वेळा तक्रारी करूनही प्रशासनाने याची दखल घेतली नसल्यामुळे या बदली प्रकरणात बड्या राजकीय पक्षांचा हस्थक्षेप आहे की काय? असा प्रश्नही  आंदोलनकर्त्यांनी उपस्थित केला आहे.
या आंदोलनात शेतकरी कामगार पक्षाचे नेते भाई मोहन गुंड, शिवसंग्रामचे माजी तालुकाध्यक्ष बाळासाहेब गलांडे, रिपाईचे तालुका अध्यक्ष दिपक कांबळे, सुरेश बचुटे, बाळासाहेब ओव्हाळ, पंडित चाळक, प्रवीण खोडसे, शिवाजी वाघमारे, प्रवीण चाळक, अशोक रोडे, रजाक सय्यद, बाबासाहेब अहिरे, गोपीनाथ  इनकर, गणेश तपसे, किरण पारवे, सुमीत वाघमारे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

जर नायब तहसीलदार सचिन देशपांडे यांची बदली नाही झाली तर औरंगाबाद येथील विभागीय आयुक्त कार्यालयामध्ये ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा निवेदनात दिला आहे. आंदोलना दरम्यान देशपांडे हटाव केज;  तहसील बचाव !अशा घोषणांनी तहसील परिसर दणाणुन सोडला होता.

No comments