Breaking News

मटका अड्ड्यावर पोलिसांची धाड

गौतम बचुटे । केज
तालुक्यातील उमरी येथे पोलिसांनी मटका अड्ड्यावर धाड टाकून साहित्यासह एकास ताब्यात घेतले.


केज तालुक्यातील उमरी येथील दत्त मंदिरा समोर बालाजी भागवत कसबे हा जादा पैशाचे आमिष दाखवून कल्याण नावाचा मटका बुक्की चालवीत असल्याची माहिती पोलिसांना मिळताच पोलीस निरीक्षक प्रदीप त्रिभुवन यांच्या मार्गदर्शनाखाली दि.३१ सप्टेंबर रोजी दुपारी १२:०० वा. च्या दरम्यान पोलिसांनी धाड टाकून आरोपी बालाजी कसबे यास ताब्यात घेतले. त्याच्या कडून जुगाराचे साहित्य व नगदी ५८० रु. असा मुद्देमाल जप्त केला.
पोलीस नाईक अशोक नामदास यांच्या फिर्यादी वरून बेकायदेशपणे जुगार व मटका घेत असल्याच्या आरोपाखाली बालाजी कसबे यांच्या विरोधात केज पोलीस स्टेशनला गु.र.न. ३४३/२०२० मुंबई जुगार कायद्याचे कलम १२ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस जमादार धनपाल लोखंडे हे करीत आहेत. 

No comments