Breaking News

बलात्कारातील आरोपी शेख पाशाचा जामीन अर्ज फेटाळला


दीड महिन्यापासून फरार असणाऱ्या आरोपीस न्यायालयाची चपराक
बीड : 
पेठ बीड भागातील तेलगाव नाका येथील शेख पाशा शेख हाशम याने लग्नाचे आमिष दाखवून सतत दोन वर्ष बलात्कार केला.अशी फिर्याद पीडितेने दि.5 जुलै 2020 रोजी पेठ बीड पोलीस स्टेशन येथे दाखल केली होती.यातील आरोपी याने जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री हुद्दार साहेब यांच्या न्यायालयात अटकपूर्व जमानत मिळणे बाबत अर्ज सादर केला होता. त्यावर सुनावणी होऊन जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री हुद्दार साहेब यांनी आरोपी शेख पाशा शेख हाशम याचा अटकपूर्व जामीन अर्ज आज दिनांक 19 ऑगस्ट 2020 रोजी फेटाळून लावून गुन्हा करणाऱ्या आरोपीस चपराक दिली आहे. सरकारी वकील म्हणून मिलिंद वाघीरकर यांनी काम पाहिले.
घटनेची थोडक्यात हकीकत अशी की, पीडितेने बीड शहरातील पेठ बीड पोलिस स्टेशन येथे 5 जुलै रोजी आरोपी शेख पाशा शेख हाशम विरुद्ध लग्नाचे आमिष दाखवून सतत दोन वर्षे बलात्कार केला अशी फिर्याद दिली. या फिर्यादीवरून आरोपी विरुद्ध कलम 376,506 भादवी प्रमाणे गुन्हा दाखल झाला होता. सदर फिर्याद दाखल झाल्यापासून आरोपी हा फरार झालेला होता.आरोपी फरार असताना सुद्धा पीडितेला आरोपीचे भाऊ व त्याची पहिली पत्नी यांनी 15 जुलै रोजी तु दाखल केलेला गुन्हा परत घे नसता जमानत मिळण्यापूर्वी तुला जीवे मारूत अशी घरी जाऊन धमकी देत मारहाण केली.त्याबाबत पेठ बीड पोलिस स्टेशनला  अदखलपात्र गुन्हा देखील दाखल झालेला आहे.यासह आरोपी शेख पाशा व त्याच्या नातेवाईका विरुद्ध शिवाजीनगर पोलीस स्टेशन, गेवराई पोलीस स्टेशन आदी 11 पेक्षा अधिक पोलिस स्टेशनला अदखलपात्र गुन्हे वेळोवेळी दाखल झालेले आहेत.पीडितेच्या तक्रारीवरुन पेठ बीड पोलीस स्टेशनला शेख पाशा विरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल झाल्यापासून आरोपी शेख पाशा हा अटकेच्या भीतीने फरार आहे.त्याने जिल्हा व सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीन मिळण्यासाठी अर्ज देखील दाखल केलेला होता.सदर जमानत अर्जावर पिढीतीने तीव्र आक्षेप घेतला होता.तसेच शपथपत्र व जवळपास अकरा अदखलपात्र गुन्ह्याची यादीसह आक्षेप घेतला होता. त्यावर दोन्ही वकिलांनी युक्तिवाद केला. सरकारी वकील मिलिंद वाघीरकर यांनी जामीन अर्जात पोलिसांनी घेतलेला आक्षेप व तिची बाजू यावर प्रखर युक्तिवाद केला.सरकारी वकिलांचा युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायमूर्ती हुद्दार साहेब, बीड जिल्हा व सत्र न्यायाधीश यांनी आरोपीचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला आहे. या निकालामुळे आरोपीस चपराक बसली असून पीडितेने समाधान व्यक्त करत पोलिसांनी आता तरी आरोपीला अटक करावी अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. पीडितेने म्हटले आहे की, आरोपी याने गुन्हा दाखल झाल्यानंतर माझ्यासह या घटनेतील साक्षीदाराला देखील जीवे मारण्याची धमकी दिली आहे याप्रकरणी पोलिस अधीक्षक बीड आणि पेठ बीड पोलिस स्टेशन व शिवाजीनगर पोलीस स्टेशनला अदखलपात्र गुन्हा देखील झालेला असताना सदर आरोपीला पेठ बीड पोलिस अद्याप अटक करत नाहीत. आरोपी पासून जीवितास धोका असल्याने आरोपीस आता तरी तात्काळ अटक करून न्याय द्यावा अशी अपेक्षा पीडितेने व्यक्त केली आहे.

2 comments: