Breaking News

कोरोनाकडे संकट म्हणून नव्हे संधी म्हणून बघावे-- ग्रामविकास मंत्री मुश्रीफ


ऑनलाइन ई-मेल मेळावा : बीड जिल्ह्यातून तीन हजारावर महिला झाल्या सहभागी
बीड :
उमेद अभियानातील स्वयंसहाय्यता गटांनी कोरोनाकडे संकट म्हणून न बघता संधी म्हणून बघावे व जागतिक बाजारपेठेत तग धरण्याच्या दृष्टीकोनातून स्वतःच्या व्यवसायामध्ये अमुलाग्र बदल करावा, असे आव्हान राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले.

महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानातर्फे आयोजित ऑनलाईन महिला उद्बोधन मेळाव्यात ते बोलत होते. अभियानाच्या या ऑनलाइन मिळाव्यात राज्यभरातून जवळपास एक लाख महिला सहभागी झाल्या होत्या. त्यापैकी जवळपास बीड जिल्ह्यात तीन हजार पेक्षा जास्त महिलांनी सहभाग घेतला.
74 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान आतील स्वयंसहाय्यता गटाच्या महिला व समुदाय संसाधन व्यक्तीसाठी ऑनलाईन पद्धतीने महिला उद्बोधन मेळावा राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार विधानपरिषद सदस्यां व माजी उपसभापती डॉ. नीलम गोरे, उमेद अभियाना च्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती आर. विमला यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.
या मेळाव्यास राज्यातील जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक उमेद अभियानातील राज्य जिल्हा तालुका व क्लस्टरस्तरावरील सर्व अधिकारी आणि कर्मचारी तसेच राज्यातील सर्व जिल्ह्यांमधून महिला ऑनलाइन पद्धतीने सहभागी झाल्या होत्या.
या मेळाव्यात मार्गदर्शन करताना श्री मुश्रीफ यांनी स्वयंसहायता गटाची चळवळ ही महिलांना विकासाच्या मुख्यधारेत आणणारी महत्वाची चळवळ असल्याचे सांगितले. कोरोना महामारी मुळे महामारीमूळे निर्माण झालेली स्थिती अर्थ संधीत परिवर्तित करण्याचे त्यांनी आवाहन केले.
महिलांच्या सहभागाशिवाय पूर्ण विकास शक्य होणार नाही. देशास खऱ्या अर्थाने बलशाली करण्यासाठी महिला सक्षमीकरण अत्यंत गरजेचे आहे असे प्रतिपादन त्यांनी केले. पुढे ते म्हणाले महिलांनी गटांच्या माध्यमातून तयार केलेले साहित्य व उत्पादनात ॲमेझॉनद्वारे जागतिक बाजारपेठ मिळवून देण्याचे काम उमेद अभियानाच्या माध्यमातून करण्यात येत आहे. बँका कडून घेतलेले कर्ज महिला वेळेवर परतफेड करत आहेत ही खूप गौरवाची बाब असल्याचे त्यांनी सांगितले.
 याप्रसंगी त्यांनी उमेद वार्तापत्र स्वातंत्र्यदिन विशेषांकाचे प्रकाशन केले. दिनांक 15 ऑगस्ट 2020 ते 31 ऑगस्ट 2020 या कालावधीत 'जागर अस्मितेचा' ही मोहीम हाती घेण्यात आलेली आहे. तरी यामध्ये जास्तीत जास्त गटांनी सहभागी होऊन त्यांनी तरी सॅनिटरी नॅपकिन विक्री करण्यासाठी पुढाकार घ्यावा व गावातील प्रत्येक ताईनी ' अस्मिता प्लस' हे त्यांनी तरी नॅपकिन चा वापरावे असे त्यांनी आव्हान केले
 'एक ग्रामपंचायत एक सखी' या उपक्रमाला अधिक गती मिळण्याकरिता स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून 15 ऑगस्ट ते 31 ऑगस्ट 2020 दरम्यान उमेद महिला सक्षमीकरण अभियान राबविण्यात येणार असून या मोहिमेतून ग्रामस्थांना प्रधानमंत्री जीवन ज्योति विमा, प्रधानमंत्री जीवन सुरक्षा विमा व अटल पेन्शन योजना या सामाजिक सुरक्षा योजनेचा लाभ मिळवून देण्याचे उद्दिष्ट ठरविण्यात आले आहे. या अभियानात यशस्वी करण्यासाठी जास्तीत जास्त महिलांनी काम करण्यासाठी पुढाकार घ्यावा असे त्यांनी आवाहन केले.
समाजामधील 50 टक्के शक्ती म्हणजे नारीशक्ती आहे. या नारी शक्तीचा सन्मान व सक्षमीकरण उमेद अभियानाच्या माध्यमातून करण्यात येत असून स्वयंसहाय्यता गटांच्या माध्यमातून निर्माण होणाऱ्या उत्पादनास बाजारपेठ उमेदच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात येत असल्याचे प्रतिपादन ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी केले.
विधान परिषद सदस्य तथा माजी उपसभापती डॉ. नीलम गोरे मार्गदर्शन करतांना म्‍हणाल्‍या उमेद अभियाना मुळे महिला अधिक अभिव्यक्त होत असून त्यांची राजकीय भागीदारी वाढली आहे व महिलांना नवीन ओळख निर्माण झालेली आहे. आर्थिक समावेशन व सखी या उपक्रमाबाबत उमेद अभियाना च्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती आर. विमला यांनी मार्गदर्शन केले.
 मेळाव्यात अस्मिता जागर माहिमेची माहिती उपसंचालक श्री दादाभाऊ गुंजाळ यांनी दिली तर (सामाजिक समावेशन विषयक राज्य अभियान सामाजिक समावेशन व संस्थीय बांधन) श्रीमती वैशाली ठाकूर व राज्य अभियान व्यवस्थापक (उपजीविका) श्री योगेश भामरे यांनी मार्गदर्शन केले या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन व सचिव श्री चंद्रमणी खंदारे यांनी केले.

2 comments: