Breaking News

पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्तेे बीडच्या पोलीस मुख्यालयातील कोविड विलगीकरण कक्षाचे उद्घाटन

बीड :  पोलीस मुख्यालय बीड येथे  पोलीस कर्मचारी आणि त्यांचे कुटुंबीय यांच्या वैद्यकीय देखभाली साठी उभारण्यात आलेल्या कोविंड विलगीकरण कक्षाचे उद्घाटन राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते झाले.

याप्रसंगी आमदार संदीप क्षीरसागर, आमदार विनायक मेटे,  जिल्हाधिकारी राहूल रेखावार, जिल्हा पोलिस अधिक्षक हर्ष पोद्दार,  जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार यांच्या सह पोलिस अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.

कोरमा कालावधीत जिल्ह्यातील करोना संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांना मोठ्या प्रमाणात बंदोबस्त आणि कर्तव्यासाठी जनतेच्या संपर्कात यावे लागते. या कोरोना योद्ध्यांची  देखभाल व वैद्यकीय सुविधा देण्यासाठी या कोविड विलगीकरण कक्षाचा कक्षाचा उपयोग होणार आहे 

No comments