Breaking News

कोटींगच्या कारखान्यात स्फोट, एकाचा मृत्यू : बीडच्या गिराम नगर मधील घटना

(छाया : उत्तम ओव्हाळ)

बीड : पावडर कोटींगच्या कारखान्या मध्ये गॅस गळतीमुळे स्फोट झाला असून या भीषण दुर्घटनेत कारखान्यातील काम करणाऱ्या एका कामगाराचा मृत्यू झाला तर अन्य तिघे गंभीर जखमी झाले आहेत.  ही दुर्देवी घटना बीड शहरातील अंबिका चौक परिसरात असणाऱ्या गिराम नगरमध्ये घडली. घटनेची माहिती मिळताच शिवाजीनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमींना उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार  शहरातील अंबिका चौक परिसरातील करपरा नदीलगत असलेल्या गिराम नगर मध्ये  खिडक्या आणि स्लाइडिंग बनविण्याचा कारखाना आहे. याठिकाणी पावडर कोटींगचा व्यवसाय चालतो. मंगळवारी दुपारी ३.३० वाजण्याच्या सुमारास गॅस गळती होऊन त्याचा स्फोट झाला. यात चार जण गंभीररित्या जखमी झाले होते. जखमीं पैकी संतोष गिराम (वय ३०, रा. गिराम नगर)  याचा मृत्यू झाला तर अन्य तिघांवर बीड च्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान हा स्फोट एवढा भीषण होता, की त्यावेळी आजूबाजूचा परिसर हादरून गेला होता. त्यामुळे काय झालं हे पाहण्यासाठी नागरिकांनी इथं गर्दी केली होती. 

No comments