Breaking News

आष्टीत अॕन्टीजन टेस्टला व्यापाऱ्यांचा प्रतिसाद; तपासणी केंद्रावर आ.धस ठाण मांडून


के. के निकाळजे । आष्टी
शहरात मंगळवारी सुरु करण्यात आलेल्या अॕन्टीजन टेस्टला शहर व्यापा-यांसह नागरिकांनी देखील उत्स्फुर्त प्रतिसाद दिल्याचे दिसून आले.तर या टेस्टसाठी नागरिकांना आवाहन करत तपासणी केंद्रावर आ.सुरेश धस हे ठाण मांडून होते.

आष्टी शहरातील जि.प.कन्या प्रशाला,जि.प.मुलांची शाळा,महात्मा गांधी विद्यालय या तीन शाळेच्या प्रांगणात मंगळवारी अॕन्टीजन टेस्टद्वारे व्यापा-यांसह नागरिकांच्या तपासणीस सुरुवात झाली आहे.भारतीय जैन संघटना,जिल्हा प्रशासन,तिरुमला गृप,व्यापारी महासंघ आणि स्थानिक नगरपंचायत प्रशासनाच्या संयुक्त विद्यमाने या चाचण्या घेण्यात येत आहेत.यामध्ये व्यापा-यांनी उत्स्फुर्त प्रतिसाद देत आपल्या टेस्ट करुन घेतल्या.तर व्यापा-यांसह शहरातील इतर नागरिकांनी देखील या टेस्टच्या माध्यमातून आपण सुरक्षित असल्याची खाञी केली.अॕन्टीजन टेस्ट सर्वांनी करावी असे आवाहन आ.सुरेश धस यांनी स्वताः सोमवारी सोशल मिडीयाच्या माध्यमातून केल्यानंतर मंगळवारी वरील तीनही ठिकाणी आ.धस हे अॕन्टीजन टेस्ट सुरळीत पणे सुरु आहेत की नाही,तसेच याला प्रतिसाद कसा मिळतोय या सर्व परिस्थीतीची माहिती घेत तपासणी केंद्रावर ठाण मांडून होते.

अचानक जि.प.मुलांच्या शाळेत विद्युतपुरवठा खंडीत झाल्याने टेस्ट थांबविण्यात आल्याचे आ.धस यांच्या लक्षात येताच त्यांनी तात्काळ महावितरणच्या कर्मचाऱ्यांना पाचारण करत सदर विज पुरवठा सुरळीत करुन दिला. मंगळवारी झालेल्या टेस्टमध्ये तीनही केंद्रात एकूण 619 जणांची टेस्ट करण्यात आली ज्यामध्ये 15 पाॕझीटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत.

No comments