Breaking News

गौरी गणपती सजावट स्पर्धेत शितल तांबे प्रथम तर सुवर्णा देशपांडे द्वितीयआष्टी : आ. सुरेश धस मित्र मंडळाच्या वतीने दरवर्षी गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर अनेक सामाजिक उपक्रम राबवले जातात.असाच एक आगळावेगळा उपक्रम यावर्षी गणेश उत्सवानिमित्त आष्टी व मुर्शदपुर शहरातील नागरिकांसाठी गौरी गणपती सजावट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.ज्यामध्ये शितल अशोक तांबे यांनी प्रथम,सौ.सुवर्णा रविंद्र देशपांडे यांनी द्वितीय तर मनिषा महेश चौरे यांनी तृतीय क्रमांक पटकाविला तर कादंबरी कुमकर, किरण मुळे, श्रृती गर्जे यांचा उत्तेजनार्थ पारितोषिक देऊन सन्मान करण्यात येणार आहे.


कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गणेश उत्सव सर्वञ शांततेत पार पडत आहेत.त्यामुळे यंदा घरच्या घरी होणाऱ्या उत्सवामध्ये आ.सुरेश धस मिञ मंडळाच्या वतीने आष्टी व मुर्शदपूर येथील नागरिकांसाठी गौरी गणपती सजावट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.ज्यामध्ये 63 स्पर्धकांनी आपला सहभाग नोंदविला होता.यातून निवडण्यात आलेल्या विजेत्यांमध्ये प्रथम क्रमांक पटकाविणा-या सौ.शितल तांबे यांनी शिवकालीन शेती आणि गडकिल्ल्यांचा देखावा तर द्वितीय क्रमांक पटकाविणा-या सौ.सुवर्णा देशपांडे यांनी आत्मनिर्भर भारताच्या माध्यमातून लाल किल्ल्याची उभारणी केली होती.तर तृतीय क्रमांक पटकाविणा-या सौ.मनिषा चौरे यांनी सद्यस्थितीत कोरोनाच्या माध्यमातून सामाजिकतेची जाणिव करुन देणारा देखावा रेखाटला होता.या विजेत्यांना रोख पारितोषिक तसेच सहभागी स्पर्धकांना मिञ मंडळाच्या वतीने सन्मानचिन्ह देण्यात येणार आहे.

2 comments: