Breaking News

कंटेन्मेंट झोन मधील महिलांना पोलीस प्रशासनाकडून सॅनिटरी पॅडचे वाटप

गौतम बचुटे । केज 
केज तालुक्यातील कंटेन्मेंट झोन मधील गावातील महिलांना केज पोलीसांच्या वतीने सॅनिटरी पॅडचे वाटप करण्यात आले.

केज तालुक्यातील साळेगाव, आरणगाव आणि कोल्हेवस्ती या गावात कोरोना बाधित रुग्ण आढळून आल्यामुळे या गावात अनिश्चित काळासाठी संचारबंदी असून ही गावे कंटेन्मेंट झोन म्हणून घोषित करण्यात आली आहेत. या गावातील महिलांना केज पोलीसांच्या वतीने सॅनिटरी पॅडचे वाटप करण्यात आले. पोलीस निरीक्षक प्रदीप त्रिभुवन, जेष्ठ पोलीस उपनिरीक्षक दादासाहेब सिद्धे यांच्या मार्गदर्शनाखाली हे वितरण करण्यात आले. या वेळी साळेगावचे सरपंच कैलास जाधव, महिला पोलीस उपनिरीक्षक अर्चना भोसले, महिला पोलीस कॉन्स्टेबल चौरे मॅडम, आशा स्वयंसेविका दैवशाला सरवदे, गृह रक्षक दलाच्या श्रीमती वायबसे व श्रीमती काकडे आणि गावातील महिला उपस्थित होत्या.

No comments