Breaking News

मंदीर खुल करण्यासाठी आष्टीत भाजपाचे घंटानाद

जयदत्त धस यांच्या नेतृत्वात आष्टीकर आंदोलनात झाले सहभागी 
के. के. निकाळजे । आष्टी
लोकनेत्या मा.पंकजाताई मुंडे व भाजपच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षा खा.डॉ. प्रितमताई मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली आष्टी शहरातील शनिमंदिरासमोर युवानेते जयदत्त धस यांच्या नेतृत्वाखाली घंटानाद आंदोलन करण्यात आले.
राज्यात कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर टाळेबंदीची घोषणा करण्यात आली होती. तेंव्हापासून सर्वच धार्मिक स्थळे बंद करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. मात्र पुनश्च हरीओम नंतर विविध क्षेत्रात सुट देण्यात आली. अनेक व्यवसाय दुकाने, वाहने, कारखाने सर्वच सुरळीत सुरू करण्यात आली. अनेक माॕल देखील खुली करण्यात येत आहेत.मात्र राज्यातील देवस्थाने बंद का? असा सवाल करीत दार उघड उध्दवा दार उघड, हर हर महादेव, उध्दवा दार उघड, मदिरा चालू मंदिर बंद, दारू नको भक्तीचे दार उघड, भक्तांना जेल गुन्हेगारांना बेल अशा घोषणांनी शनिमंदिर परिसर दणाणुन गेला. सोशल डिस्टंन्सिंग पाळून हे आंदोलन पार पडले. यावेळी नगराध्यक्ष भारत मुरकुटे, उपनगराध्यक्ष सुनील रेडेकर,नगरसेवक किशोर झरेकर, दिपक निकाळजे, संतोष मुरकुटे, ज्ञानदेव वाल्हेकर, शरीफ शेख, मुर्शदपूरचे सरपंच सागर धोंडे, सय्यद शफी, शैलेश सहस्त्रबुद्धे, बाळासाहेब घोडके, अनंत जोशी, संतोष रणसिंग, प्रविण कदम, अश्पाक आतार, शुभम लोखंडे, बबन कदम, सुरज रोकडे यांच्यासह जयभोले भजनी मंडळाचे घोरपडे, श्रीधर ससाणे, लाला राक्षे, सुरेश डोमकावळे, लक्ष्मीबाई धोंडे आदी उपस्थीत होते.

No comments