Breaking News

समाजाने आदर्श घेण्यासारखा भाजपाचे युवा नेते अशोक रसाळ यांचा विवाह


बीड : सध्या जगभरात कोरोना महामारीने थैमान घातले असल्यामुळे, मानवी जनजीवन विसकळीत झालेले आहे. या कोरोना संसर्ग रोगामुळे मोठ मोठे उद्योग-व्यवसाय बंद पडलेले आहेत. या कोरोना संसर्गामध्ये सर्व सामान्यांची आर्थीक परिस्थिती हालाकीची झालेली आहे. अशातच गोर-गरीब माणसांच्या किशाला सुरा म्हणजे मोठ मोठे विवाह सोहळे.  या कोरोना महामारीतुन सर्वांनी बाहेर येण्यासाठी आपले प्रतिष्ठेचे सर्व कार्यक्रम मोठे व खर्चीक न करता साध्या पद्धतीने करणे गरजचे आहे. असाच समाजाने आदर्श घेण्यासारखा भाजपाचे युवा नेते अशोक रसाळ यांचा विवाह सोहळा होय.

आज दि.13 रोजी मांरजसुंबा येथील भाजपाचे युवा नेते अशोक रसाळ यांचा विवाह मुळुक येथे साध्या पद्धतीने संपन्न झाला. अशोक रसाळ यांना राजकारणासोबतच समाजकारणाची जास्त आवड असल्याने ते गोर-गरीबांची सतत मदत करत असतात. अशोक रसाळ हे माजी ग्रामविकास मंत्री पंकजाताई मुंडे, बीड जिल्ह्याच्या खा.डॉ.प्रितमताई मुंडे व भाजपा नेते अटल जनसेवक रमेश पोकळे यांच्या नेतृत्वामध्ये काम करतान असतांना, यांचा बीड तालुक्यामध्ये मोठ्ठा जनसंपर्क आहे. परंतु सध्या ओढावलेल्या कोराना वैश्विकमहारीची आपल्यामुळे नातेवाईकांना, कार्यकर्त्यांना, मित्रपरिवाराला कोणतीही अडचण येवू नये आणि आपल्यामुळे इतरांना नाहक त्रास होऊ नये म्हणुन गर्दी न करता अगदी साध्या पद्धतीने विवाह संपन्न केला.
अशोक रसाळ व ऐश्वर्या यांच्या विवाह सोहळ्या निमित्त माजी ग्रामविकास मंत्री पंकजाताई मुंडे, अण्णासाहेब पाटील आर्थीक विकास महामंडळाचे अध्यक्ष आ.नरेंद्रजी पाटील यांनी वाईस कॉलद्वारे तर भाजपा महाराष्ट्र प्रदेश कार्यसमीतीचे सदस्य रमेशभाऊ पोकळे यांनी विवाहस्थळी उपस्थित राहुन शुभेच्छा दिला.

No comments