Breaking News

धारूरात शस्त्र दरोडा, मारहाणीत महिला गंभीर जखमी


हमूमान बडे । किल्ले धारूर 

शहरात आश्रमातील चोरीच्या घटनेला 24 तासाचा कालावधी लोटत नाही, तोच शहरातील आझाद नगर मध्ये बुधवारी पहाटेच्या दरम्यान घरात घुसून महिलेवर हल्ला कोयत्याने हल्ला करत लुटण्याचा प्रयत्न केल्याच्या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. जखमी महिलेस येथील ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करुन अंबाजोगाई येथील स्वा.रा.ति. रुग्णालयात हलवण्यात आले आहे.
शहराच्या जवळच असणाऱ्या चिंचपूर रोडवरील एका आश्रमात सोमवारी रात्री चोरट्यांनी धुमाकूळ घातला होता. ही घटना ताजी असताना पुन्हा शहरातील आझादनगर भागात  बुधवार  पहाटेच्या सुमारास शस्त्र दरोडा टाकून जबरी चोरी केल्याची घटना घडल्याने एकच खळबळ उडाली आहे. याठिकाणी चोरीसाठी आलेल्या चोरट्यांनी धारदार शस्त्र घेऊन घरात प्रवेश करत महिलेवर हल्ला करून चोरी केली. जखमी  महिलेस धारूर येथील ग्रामीण रुग्णालयात प्रथम उपचारासाठी पाठवण्यात आले आसता आवश्यक असणाऱ्या पुढील उपचारासाठी या महिलेस अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. दिवसेंदिवस चोरीच्या घटना वाढत जात असल्याने धारूरकर भयभीत झाले आहेत. धारूर पोलिस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे.  ऐन सणासुदीच्या काळात घडत असलेल्या चोरीच्या घटना पोलिसांसाठी आवाहन ठरत आहे. सहाय्यक पोलिस निरिक्षक सुरेखा धस यांनी घटनास्थळी जावून सखोल चौकशी सुरु केली आहे. या प्रकरणी एका संशियीतास ताब्यात घेतले असून चौकशी सुरु असल्याचे धस यांनी सांगितले.

No comments