Breaking News

गुरूजी बाईच्या फ्रेंड रिक्वेस्टला फसले अन् तिच्या नवऱ्याने धडा शिकविल्याने हात मोडून गळ्यात अडकले !

सरांच्या धर्म पत्नीच्या फ्रेंडची केली पाच जणांनी काठीने धुलाई !
गौतम।बचुटे । केज
एका कंत्राटी गुरुजींना दुसऱ्याच्या बायकोने फ्रेंड रिक्वेस्ट पाठविलेली तिच्या 'फेस बुक फ्रेंड गुरूजीला' चांगलेच महागात पडले. कंत्राटी गुरुजीला तिच्या नवऱ्याने त्यांच्या साथीदाराच्या मदतीने आपल्या बायकोच्या फेस बुक फ्रेंड गुरुजींला छडी ऐवजी काठीचा प्रसाद दिला. यात तिच्या फेसबुक फ्रेंड गुरुजींचा हात मोडून  गुरुजींच्याच गळ्यात पडल्याची केज तालुक्यात चांगलीच चर्चा सुरू आहे.

केज तालुक्यातील एका कंत्राटी 'गुरुजीला' एकाच्या बायकोने फेस बुक रिक्वेस्ट पाठविली. मात्र गुरुजींच्या फेस बुक रिक्वेस्ट पाठविणाऱ्या महिलेच्या धर्म पतीने तिचा मोबाईल पाहिला आणि ती रिक्वेस्ट बघून तिचा नवरा भलताच चिडला. त्यांच्या रागाचा पारा चढला मग त्यांनी बायको ऐवजी तिच्या 'फ्रेंड गुरुजीला' चांगली अद्दल नव्हे तर गुरुजीच्या भाषेत 'शिक्षा' करायची असे मनोमन ठरविले. कारण गुरुजींना माहीत आहे की , पूर्वी "छडी लागे छम छम; विद्या येई घमघम." अशी म्हण होती; पण शिक्षा देण्यासाठी हातात छडी ऐवजी काठी घेतली. कारण आता शाळेत विद्यार्थ्यांना शारीरिक किंवा मानसिक शिक्षा देणे हे शिक्षणाचा अधिकार-२००९ नुसार फौजदारी स्वरूपाचा गुन्हा आहे. हे त्या गुरुजींना माहीत असावे. म्हणून मग त्यांनी बायकोच्या 'फ्रेंड गुरुजीला' शाळेच्या बाहेर आणि तेही साथीदारांच्या मदतीने चांगलाच धोपटीत गुरुजींलाच 'धडा' शिकविला आणि मुका मार देऊन जीवे मारण्याचा 'प्रेमळ' सल्लाही दिला. यात त्या फ्रेंड गुरुजीचा हात मोडला आहे. मग त्या गुरुजींनी शाळा बंद असल्यामुळे शाळे ऐवजी पोलीस ठाणे गाठून आपल्या वरील आपबिती पोलीस अधिकाऱ्या समोर कथन केली. त्या नुसार गुरुजीच्या फिर्यादी नुसार फेसबुक फ्रेंड रिक्वेस्ट पाठविणाऱ्या महिलेचा पती आणि त्यांचे चार साथीदार अशा पाच जणांच्या विरोधात गु.र.नं. ३०८/२०२० भा.दं.वि. ३०८, ३२६ ,१४३, १४७, १४८, १४९, ३२३, आणि ५०४ नुसार गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक प्रदीप त्रिभुवन यांच्या मार्गदर्शनाखाली जेष्ठ पोलीस उपनिरीक्षक दादासाहेब सिद्धे हे करीत आहेत. मात्र केज तालुक्यातील ते 'गुरुजी' कोण ? आणि  'फ्रेंड रिक्वेस्ट काय असावी ज्यामुळे गुरुजी हात मोडुन चांगलाच धडा शिकले याची चर्चा सुरू आहे.

No comments