Breaking News

बीडमध्ये शिवसेनिकांनी कर्नाटकाच्या मुख्यमंत्र्यांच्या प्रतिमेला जोडे मारून त्यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळला

बेळगाव मधील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा विटंबन प्रकरण : शिवसेनिक बीडमध्ये  झाले आक्रमक
बीड : कर्नाटकात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा काढल्यानंतर महाराष्ट्रासह देशभरात संताप व्यक्त केला जात असताना बीड मध्ये शिवसेनीक आक्रमक झाले आहेत. रविवारी नगर नाका चौकात 'भाजपा सरकारच करायचं काय खाली मुंडक'वर पाय आशा घोषणा देत शिवसेनिकांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री ए. डी.  येदुरपप्पा यांच्या प्रतिमेला जोडे मारत त्यांचा यावेळी पुतळा ही जाळला.

कर्नाटकात  राज्यातील  बेळगाव  जिल्ह्यामध्ये भाजपा  सरकारने पोलीसांच्या संरक्षणात छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा काढण्यात आला. त्यांनतर महाराष्ट्रासह देशभरात शिवप्रेमींमध्ये भाजपा सरकार विरोधात असंतोष निर्माण झाला असून सर्वस्तरातून संताप व्यक्त केला जात आहे. बीड मध्ये ही शिवसेना आक्रमक झाली होती. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांच्या नेतृवात शिवसेनिकांनी शहरातील नगर नाका चौकात रविवारी दुपारी कर्नाटक भाजपा सरकारचा निषेध करत मुख्यमंत्री ए. डी.  येदुरपप्पा यांच्या विरोधात घोषणाबाजी करून त्यांच्या बॅनरवरील प्रतिमेस जोडे मारण्यात आले. तसेच त्यांचा बॅनरवरील फोटोही यावेळी जाळण्यात आला. भाजप सरकारच करायचं काय खाली मुंडक वर पाय आशा घोषणा देत शिवसेनिकांनी आपला संताप व्यक्त केला. या आंदोलनात शिवसेनेचे जिल्हाप्रमुख कुंडलीक खांडे, जिल्हा प्रमुख सचिन मूळूक यांच्यासह बाळासाहेब अंभोरे, अरुणनाना डाके, दिलीप भोसले व शिवसेनिक सहभागी झाले होते.

No comments