Breaking News

कोविड - १९ परस्थीतीचा गांभीर्याने विचार करून जेईई आणि नीट परीक्षा रद्द करा- काँग्रेस

माजलगाव : कोविड 19 साथरोगामुळे निर्माण झालेली परिस्थिती लक्षात घेता सध्याच्या परिस्थितीत JEE/ NEET या परीक्षा घेण्यात येऊ नयेत यासाठी बीड जिल्हा काँग्रेस कमिटी अनु .जाती विभागाचे जिल्हा कार्याध्यक्ष दत्ता कांबळे  यांचे नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले.
तसेच उपविभागीय अधिकारी,माजलगाव  यांचे मार्फत देशाचे पंतप्रधान यांना सदर मागणीचे निवेदन देण्यात आले.
अखिल भारतीय काँग्रेस कमिटी आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या प्राप्त सुचनेनुसार कोविड 19 साथरोगामुळे निर्माण झालेली परिस्थिती लक्षात घेता सध्याच्या परिस्थितीत JEE/ NEET या परीक्षा घेण्यात येऊ नयेत यासाठी बीड जिल्हा काँग्रेस कमिटी अनु .जाती विभागाचे जिल्हा कार्याध्यक्ष दत्ता कांबळे यांचे नेतृत्वाखाली शुक्रवार,दिनांक २८ रोजी उपविभागीय अधिकारी माजलगाव मार्फत देशाचे पंतप्रधान यांना निवेदन देण्यात आले.

No comments