Breaking News

आमदार साहेब सर्व सामान्य कार्यकर्त्याला न्याय देणार का ?

बाबासाहेब देशमाने । दिंद्रुड
 माजलगाव तालुक्यातील दिंद्रुड ग्रामपंचायतचा कार्यकाळ १९ ऑगस्ट रोजी संपणार आहे. सर्व तालुक्याची नजर ही दिंद्रुड ग्रामपंचायतीवर आहे. महविकास आघाडीने ज्या ग्रामपंचायतीचा कार्यकाळ संपला आहे. त्यावर प्रशासक नेमण्याचा निर्णय घेतला आहे. याची नियुक्ती ही आमदारांच्या सल्ल्याने पालकमंत्री करणार आहेत. त्यामुळे ही संधी मिळण्यासाठी प्रस्थपित लोकांनी आपला जोर लावला आहे. पण त्यात प्रशासक म्हणून आमदार व सोळंके परिवाराशी गेली कित्येक वर्ष एकनिष्ठ सामान्य कार्यकर्ता  अकील सय्यद यांना संधी मिळावी अशी येथील सामान्य जनता दिंद्रुडकरांची इच्छा आहे.

     अकील सय्यद यांना मानणारा खूप मोठा वर्ग आहे. त्यात त्यांचा मित्र परिवार, आणि लोकांशी आपुलकीने बोलणे व लोकांचे काम लगेच हाती घेऊन मार्गी लावणे हा त्यांच्यातील चांगुलपणा यामुळे ते प्रसिद्ध आहेत.
     नेता नव्हे कार्यकर्ता हे त्यांचे ब्रीद वाक्य संपूर्ण तालुक्याला माहिती आहे. प्रस्थापित लोकांची शिफारस धन दांडगे लोक करत आहेत. पण अकील यांची शिफारस येथील सामान्य जनता करताना दिसत आहे.अकील यांनी विधानसभेसाठी जीवाचे रान केले होते. ते स्वखर्चाने प्रचार करत होते. पूर्ण तालुका त्यांनी पिंजून काढला होता. हे सर्व गावासहित तालुक्याला माहिती आहे.
 गावातील अकील सय्यद हे असे एकमेव व्यक्तिमत्व आहे की ज्यांचा सर्व समाजाशी आपुलकीचे नाते आहे. सर्व गावाची अपेक्षा आहे की जर आमदारांनी अकील यांना संधी दिली तर नक्कीच गावाचा विकास  होईल.त्यामुळे आमदार प्रकाश सोळंके यांनी आपल्या एकनिष्ठ कार्यकर्त्याला न्याय द्यावा अशी भावना व्यक्त होत आहे.

No comments