Breaking News

निसर्गावर प्रेम करणार्‍या आ.संदिप क्षीरसागरांचा वाढदिवस झाडे लावून जोपसण्याचा संकल्प करा - माजी आ.सुनिल धांडे


शिवदर्‍यात आकराशे झाडांचा लागवड, वृक्ष लागवड सप्ताहास उर्त्स्फुत प्रतिसाद
बीड :  शहराचा आणि ग्रामिण भागाचा विकास झाला पाहिजे हा ध्यास घेतलेल्या आणि निसर्गावर प्रेम करणार्‍या आ.संदिप भैय्यांचा वाढदिवस झाडे लावून साजरा करा, त्याची जोपासना झाली पाहिजे, लावलेली झाडे जगली पाहिजेत असा संकल्प करा, मोठ्या प्रमाणात झाडे लावा. नव्या पिढीसाठी घनदाट वृक्ष उभारले पाहिजे असे आवाहन करत शिवदर्‍यातील शिवसृष्टीच्या सौंदर्‍यात भर पडण्यासाठी आ.संदिप भैय्या क्षीरसागर प्रयत्न करतील असे प्रतिपादन माजी आ.सुनिल धांडे यांनी केले आहे. 
बीड तालुक्यातील शिवदरा येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, नवगण प्रतिष्ठान यांच्या वतीने आ.संदिप भैय्या क्षीरसागर यांच्या वाढदिवसानिमित्ताने वृक्षारोपन करण्यात आले. आकराशे झाडे लावण्याचा संकल्प या ठिकाणी करण्यात आला होता. यातील पाचशे झाडांची लागवड माजी आ.सुनिल धांडे, अर्जुन रविंद्र क्षीरसागर, रा.काँ.किसान सेलचे तालुकाध्यक्ष महादेव उबाळे, रा.काँ.विद्यार्थी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पंकज बाहेगव्हाणकर, संदिप उबाळे, वैभव चिरके यांच्यासह आदींनी केली. शिवदरा येथे लावण्यात आलेल्या झाडांमध्ये सीस, बांबु, लिंब, वड, पिंपळ, अशोक आदी झाडांचा समावेश आहे. आ.संदिप भैय्या क्षीरसागर यांच्या वाढदिवसानिमित्ताने वृक्ष लागवड व वृक्ष वाटप सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यास सर्वत्र उर्त्स्फुत प्रतिसाद मिळत असून ग्रामिण भागात व शहरी भागात मोठ्या प्रमाणात झाडे लावण्या उपक्रम हाती घेतला आहे. यावेळी बोलतांना माजी आ.सुनिल धांडे म्हणाले की, शिवदरा येथे आ.संदिप भैय्या क्षीरसागर यांच्या वाढदिवसानिमित्ताने लावण्यात आलेली झाडे ही जोपासण्याची जबाबदारी आपली आहे. निसर्ग आपल्या खूप काही देतो आपण निसर्गासाठी न करता आपल्या उज्ज्वल पिढीसाठी झाडे लावली पाहिजेत. आ.संदिप भैय्या मतदार संघाचा विकास करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. त्यांचं प्राण्यांवर, निसर्गावर मोठं प्रेम आहे. इथला माणुस सक्षम झाला पाहिजे यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. आ.संदिप भैय्यांच्या वाढदिवसानिमित्ताने झाडे लावा आणि ती जोपासण्याचा संकल्प करा असे आवाहन यावेळी त्यांनी केले. 

2 comments: