Breaking News

माजलगाव पालिकेसमोर पाण्यासाठी नागरिकांचे धरणे


माजलगाव : शहरातील प्रभाग क्रमांक ९ मध्ये पाणी येत नसल्याने भर पावसाळ्यात येथील अबालवृद्धांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहेत. त्यामुळे  संतप्त झालेल्या येथील नागरिकांनी अन्याय - अत्याचार - समितीच्या नेतृत्वात येथील पालिकेसमोर सोमवारी (दि.२४) धरणे आंदोलन करत पाईप लाईन तत्काळ सुरु करून पाणी पुरवठा सुरळीतपणे करण्यात यावा अशी मागणी आंदोलकांनी यावेळी केली. 
शहरातील प्रभाग क्रमांक ९ मध्ये गेल्या काही दिवसांपासून पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणारी पाईप लाईन लिक झालेली आहे. त्यामुळे या भागातील पाणी पुरवठा बंद करण्यात आलं आहे. अनेक वेळा पाणी पुरवठा सुरळीतपणे सुरू करावा. यासाठी नागरिकांनी अनेक वेळा मागणी करून ही पालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने मात्र, याकडं साफ दुर्लक्ष केले. त्यामुळे परिसरातील अबालवृद्धांनाभर पावसाळ्यात पाण्यासाठी भटकंती करावी लागतेय. परंतु पालिकेच्या पाणी पुरवठा विभागमुळेचं नागरिकांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. त्यामुळं संतप्त झालेल्या येथील नागरिकांनी अन्याय - अत्याचार - समितीच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात मानवी हक्क अभियानचे  बीड युवक जिल्हाध्यक्ष राम वाघमारे, अशोक ढगे, राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते आरेफ खान, मूस्ताक कूरेशी, कैलास अवाड, मोसीन बागवान, अब्बासाहेब कांबळे आदींसह नागरिक सहभागी झाले होते.

No comments